जिल्हाधिकारीपदी योगेश कुंभेजकर रूजू

भंडारा :- भंडारा जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून योगेश विजय कुंभेजकर (आयएएस) यांनी आज दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. कुंभुजकर यांनी आयआयटी, मुंबई मधून बी. टेक ची पदवी प्राप्त केली असून त्यांनी सन 2018 ते 2020 या कालावधीत उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर या पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे. दिनांक 13 एप्रिल 2020 रोजी त्यांची जिल्हा परिषद नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी आज 22 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी भंडारा या पदाचा कार्यभार स्वीकारला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बांधकाम परवानगी शुल्कात 100 टक्के वाढीचा निर्णय रद्द करण्याचे निर्देश

Wed Nov 23 , 2022
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरकरांना मोठा दिलासा मुंबई :- नागपूर शहरात बांधकाम परवानगीसाठी विकास शुल्कात 100 टक्के वाढ करण्याचा स्थानिक प्रशासकीय पातळीवरील निर्णय रद्द करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नागपूरच्या विविध प्रश्नांवर काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या निर्णयामुळे नागपूरकर जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिका सभागृहाची मान्यता नसताना प्रशासकीय पातळीवर हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!