नागपूर :- महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे नागपूर शहर अध्यक्ष संदिप माने यांच्या पुढाकाराने भापकर पार्क येथे क्रासफिट जीम व सुरक्षाभिंत च्या बांधकामांच्या भुमिपुजनाच्या प्रसंगी महाराष्ट्र योग शिक्षक संघ महाराष्ट्र, नागपूर जिल्हा व नागपूर शहर च्यावतीने महाराष्ट्र राज्यात योग आयोग लागु करावा. याकरिता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणारे निवेदन व त्यासोबतच बारासुत्री मांगणीपत्र त्यांचे मानद सचिव संदिप जोशी यांना व राज्य उपाध्यक्षा सुपर्णा पाल, नागपूर शहर अध्यक्ष संदिप माने, नागपूर जिल्हा महासचिव मनोहर पाल यांनी दिले.त्याप्रसंगी संदिप जोशी यांनी याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत प्रत्यक्ष भेट देऊन पुढील कार्यवाही करीता पाठवितो असे आश्वासन दिले.
याप्रसंगी शहर कोषाध्यक्ष अर्चना लोहे, मध्य नागपूर अध्यक्ष वंदना काळे, उपाध्यक्षा योगिता मस्के, महासचिव मंदा अड्याळकर, निता माने, सिमा गोयंका,प्रेमा भोंगाडे, अर्चना ढोकरमारे, अतुल माने, मधुकर सावंत, नंदकिशोर भोयर, संजय माने, संजय मस्के, अभय सेलोकर, मनिष धांडे, सुनील नागमोते, विनोद बोरकर ईत्यादी महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.