भगवान प्रभू श्रीरामाच्या मिरवणुकीने येरखेडा दुमदुमले, ठिकाणी मिरवणुकीचे स्वागत व प्रसादाचे वितरण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी :- श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या पर्वावर तालुक्यातील येरखेडा येथील तारा माता मंदिर पंच कमिटीच्या वतीने भगवान श्रीराम व कलश यात्रेने दुमदुमले ठिकठिकाणी नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत करून प्रसादाचे वितरण केले सजविलेल्या रथावर भगवान श्रीराम, लक्ष्मण ,सीता ,हनुमान यांची येरखेडा ग्रामपंचायत चे माजी सरपंच मंगला मनीष कारेमोरे यांचे हस्ते पूजा आरती करून श्रीराम व कलश यात्रेला सुरुवात करण्यात आली कलश यात्रा तारा माता चौक , रामकृष्ण लेआउट, प्रीती लेआउट, साईप्रसाद लेआउट ,भोयर लेआउट ,उपासे लेआउट ,नगर भ्रमण करीत तारा मंदिरात मिरवणुकीचे समापन करण्यात आले मिरवणुकीचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले. मिरवणुकीतील तरुण -तरुणी भगवान श्रीरामाचा जयघोष करून नाचत होते मिरवणुकीत पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी टीकाराम भोगे गुरुजी ,जगदीश झाडे, माजी सरपंच मनीष कारेमोरे, दास बाबू ,रुपेश श्रीवास्तव, सुषमा राकडे, गौरीशंकर धीमोले, डॉ किशोर ढोले, मधुकर ढोले ,प्राजक्ता ढोले ,शिला देशमुख ,मीना दास ,यादवराव पाठे, रुपेश पारधी, मनोहर पारधी ,सरिता भोयर ,भाऊराव देशमुख ,राम देशमुख ,चंद्रभान तलमले, प्रा संजय देवडीकर ,वसंतराव फायदे, श्रीकृष्ण इंगोले, ललित गबने,लोनेश्वर देशमुख, उषा कारेमोरे, रजनी कारेमोरे,हेमलता सोनटक्के, किशोर वाहूरकर,संध्या ढिमोले, पुजारी कमलेश सहारे, सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते शोभायात्रेत राम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या वेशभूषेत असलेले दिव्यांश सोनटक्के ,श्रीमय ढोले ,चांद पवार ,रियांश मुळे, दृष्टी गेडाम, अध्यास खरवडे ,रुपल भोयर ,रियांश गेडाम, साई पारधी, रिद्धीमा पाठे यांचा पाहुण्यांचे हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन सुदाम राकडे यांनी केले व आभार प्रदर्शन मनीष कारेर्मोरे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राममंदिर सोहळ्यानिमित्त सात हजार किलोचा प्रसाद, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोराडी येथे उपक्रमाला सुरुवात

Mon Jan 22 , 2024
नागपूर :- अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीत रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणानिमित्त कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थानद्वारे सात हजार किलोचा रामहलवा प्रसाद आज तयार करण्यात आला. हा प्रसाद तयार करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला सहभाग नोंदवून उपक्रमाला सुरूवात केली. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने शेफ विष्णू मनोहर यांचेद्वारे एकूण सात हजार किलो सामग्रीतून मोठ्या कढईत प्रसाद तयार करण्यात येत आहे. त्यामुळे प्रसाद बनविण्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!