संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 23:- तालुक्यातील येरखेडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आगामी शैक्षणिक सत्राच्या शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आगामी शैक्षणिक सत्राच्या शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे उद्घाटन येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच मंगला मनीष कारेमोरे यांचे हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आल्या .यावेळी गटसाधन शिक्षक ब्रह्मानंद नागदिवे, दिनेश ठाकरे ,मुख्याध्यापिका संगीता अवसरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एस ठाकरे, एस वंजारी उपस्थित होते. शाळा पूर्व तयारी मेळाव्यात गट निदेशक शिक्षक ब्रम्हानंद नागदिवे यांनी शाळा शैक्षणिक सत्राच्या विविध विषयावर मार्गदर्शन करून विविध विषयाच्या तासीकेचे नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले ,विविध विषयाविषयी पाठ्यपुस्तका नुसार अभ्यासक्रमाचे नियोजन कोणत्या पद्धतीने करावे त्यावर सुद्धा मार्गदर्शन केले .शाळापूर्व तयारी मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना सरपंच मंगला कारेमोरे म्हणाल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपला आपल्या गावाचं नाव लौकिक करण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता अवसरे यांनी केले .संचालन यश वंजारी यांनी केले मेळाव्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक ,अंगणवाडी, सेविका ,आशा वर्कर उपस्थित होते.
येरखेडा येथे शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com