– संदीप कांबळे,कामठी
4 मार्च पर्यंत आक्षेप नोंदवा,15 मार्च ला आक्षेप निकाली निघणार,
कामठी तालुक्यातील 27 ग्रा प चा प्रारूप ‘ब्’प्रभाग रचना जाहीर
कामठी ता प्र 2:-कामठी तालुक्यातील एकूण 47 ग्रामपंचायती पैकी 27 ग्रामपंचायत चा पंचवार्षिक कार्यकाळ यावर्षीच्या शेवटी संपण्याच्या मार्गावर असल्याने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक निवडणूक विभागाने ग्रामपंचायत निहाय प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला असून या 27 ही ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना प्रारूप ब् नुकतेच जाहीर केले आहे .
सदर ग्रा प ची प्रारूप प्रभाग रचना 25 फेब्रुवारीला संबंधित ग्रा प कार्यालयात नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रारूप प्रभाग रचनेवर 4 मार्चपर्यंत नागरीकांना आपले आक्षेप व हरकती लेखी स्वरूपात कामठी तहसील कार्यालयात नोंदविता येतील तर 4 मार्च नंतर आलेल्या हरकती स्वीकारण्यात येणार नाहीत . प्राप्त झालेल्या हरकती आक्षेपवर 15 मार्च ला उपविभागीय अधिकारी निकाली काढतील.
कामठी तालुक्यात एकूण 47 ग्रामपमचायती आहेत यापैकी मुदत संपलेल्या 20 ग्रामपंचायती ची निवडणूक यापूर्वी झाली असून उर्वरित 27 ग्रा प ची मुदत संपण्याच्या मार्गावर असून यामध्ये येरखेडा,रणाळा, बिना, भिलगाव,खैरी, खसाळा, सुरादेवी, खापा,कढोली, भोवरी, आजनी,लिहिगाव, कापसी(बु),गादा,सोनेगाव,गुमथी, आवंढी,गुमथळा, तरोडी बु,परसाड,जाखेगाव, केम, दिघोरी, आडका, शिवणी, भुगाव, वडोदा चा समावेश आहे.या 27 ही ग्रामपंचायतची एकूण लोकसंख्या 70 हजार 654 असून यामध्ये 12 हजार 537 अनु जाती तर 2979 अनु जमाती ची लोकसंख्या आहे तर या 27 ग्रा प मध्ये 93प्रभाग राहणार असून एकूण 247 सदस्य निवडून येणार आहेत यामध्ये अनु जाती चे 42, अनु जमाती चे 7 , नामाप्र चे 43 व सर्वसाधारण प्रवर्गातील 155 सदस्यांचा समावेश राहील.
येरखेडा ग्रा.प. चा प्रारूप ‘प्रभागरचना जाहीर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com