भाऊसाहेब मुळक आयर्वेद महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा

नागपूर :- दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्य २१ जुन रोजी, भाऊसाहेब मुळ्क आयुर्वेद महाविद्यालय, नंदनवन, नागपुर येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक योग घेण्यात आला, डॉ. योगेश तुलशान योग प्रशिक्षक यांनी सकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान सर्वांकडून आयुष मंत्रालयाचा कॉमन योगा प्रोटोकॉल करवून घेतला.

या कार्यक्रमात महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सोबतच यावेळी च्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाची थीम’ योगाफॉरसेल्फ अँडसोसायटी’ जागृतीसाठी योग दिंडी काढण्यात आली. स्वस्थवृत्त विभागातर्फे घेण्यात आलेल्या १४ जून ते २१ जून, या योग सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी सूर्य नमस्कार स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभागप्रमुख डॉ. माधवी रेहपाडे, डॉ.ममता तलमले, डॉ. ओमप्रकाश गुल्हाने डॉ.रुपाली भनारे यांनी विशेष प्रयत्न केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय शिक्षक बोर्डाची बैठक 29 जून रोजी

Thu Jun 27 , 2024
नागपूर :- भारत स्वाभिमान ट्रस्ट यांच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी प्रदीप काटेकर यांनी माहिती दिली. भारत सरकारचा उपक्रम – भारतीय शिक्षा बोर्डाची बैठक 29 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता. श्रीमती कौशल्यादेवी माहेश्वरी महिला महाविद्यालय हिवरी ले आऊट नागपूर येथे आयोजित केली आहे. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com