यवतमाळ :- जगभरात 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिनानिमित्त श्री सत्य साई संजीवनी माता व बाल रुग्णालय यवतमाळ टीमच्या वतीने नवजात बालकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेवर केंद्रित करून माता आणि नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी गर्भधारणा, प्रस्तुती नंतर घ्यावयाची काळजी याविषयी जागतिक आरोग्य दिनानिमित्त गरोदर महिलांना मार्गदर्शन केले आहे.
जागतिक आरोग्य दिनानिमित्य विनायक बापू देशमुख नर्सिंग कॉलेज यवतमाळ येथील विद्यार्थिनींनी ‘महिला सशक्तीकरण’ विषयी पथनाट्य साजरा करण्यात आला. त्यामध्ये गरोदर महिलांना दैनंदिन जीवनात सात्विक आहार अत्यंत महत्वाचा घटक आहे, जर संतुलित आहार योग्य प्रमाणात घेतले तर बाळाचे आरोग्य सुधारते, बाळाचे आरोग्य सुधारण्यासाठी शरीराला पोषक न्यूट्रेशनची अत्यंत आवश्यकता असते. तसेच बाळाला सुदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि आरामाची आवश्यकता असते. गरोदर महिलेला मानसिकरित्या सकारात्मक असणे अत्यंत आवश्यक आहे असे आरोग्याविषयी गरोदर महिलांची विद्यार्थिनींनी जनजागृती केली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वाती राठोड यांनी केले. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्रा. सोनल देशमुख विनायक बापू देशमुख नर्सिंग कॉलेज यवतमाळ यांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री सत्य साई संजीवनी माता व बाल रुग्णालय यवतमाळ येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ शीतल चव्हाण,योगेश पवार श्री सत्य साई संजीवनी माता व बाल रुग्णालय यवतमाळ (ऍडमिन डिपार्टमेंट ), आशा अग्रवाल श्री सत्य साई संजीवनी माता व बाल रुग्णालय यवतमाळ, (पेशंट कॉर्डीनेटर ) तसेच विनायक बापू देशमुख नर्सिंग कॉलेज यवतमाळ येथील विद्यार्थिनीचे विशेष मार्गदर्शन लाभले.
आरोग्य हेच धनसंपदा : प्रा.सोनल देशमुख यांचे प्रतिपादन
गरोदर माता विषयी आरोग्याची संकलना मांडताना आरोग्य सुरळीत राहण्याकरिता पुरुषांनी आपल्या परिवारात गरोदर महिलांची देखभाल करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रा. सोनल देशमुख यांनी महिलांना आरोग्याची घ्यावयाची काळजी आणि मानसिक संतुलन, खानपान परिवारात सकारात्मक वातावरणाने गरोदर मातेच्या पोटात बाळाची वाढ होत असते. बाळाचे उद्याचे भविष्य उज्वल करण्यासाठी आरोग्याचा मुलमंत्र प्रा. सोनल देशमुख यांनी आरोग्यविषयी संकल्पना मांडली आहे.