जागतिक आरोग्य दिनानिमित्त चंद्रमणीनगरात रोगनिदान व आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

– आपल्यासह कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या-विनोद धनविजय

नागपुर – सध्या धावपळीचे जिवनशैलीमुळे लहानांपासून तर मोठयांना आज कोणत्या ना कोणत्या आजाराचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रत्येकाने आपल्यासह कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जयभीम को. ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष विनोद धनविजय यांनी केले. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जयभीम काॅ. ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी तसेच जेसीआय नागपूर सेंट्रलच्या संयुक्त विद्यमाने चंद्रमणी नगरातील पुज्य भंते महाथेरो चंद्रमणी बुद्ध विहारामध्ये गुरूवारी निःशुल्क रोगनिदान व आरोग्य शिबीराचे उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जयभीम को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे नागोराव जयकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जेसीआय नागपूर अध्यक्ष प्रिया आचार्य, सचिव आदिती पाॅल, शिबिराचे मुख्य आयोजक तसेच जेसीआय नागपूर सेंट्रलचे उपाध्यक्ष अश्विन धनविजय यांची उपस्थिती होती. विशेष अतिथीमध्ये म्हणून श्रीरंग नेने, अनुज माथूर, मयुरी मेहेरे, दत्ता सुरर्वसे, कमलेश सिरसीकर,  जयभीम काॅ. ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी सचिव मनोहर नंदेश्वर, प्रोमार्क हाॅस्पिटलचे संचालक विरेंद्र भोजपंत, डाॅ. मृदूल हुकरे, ऑप्टिक वर्ल्डचे संचालक होमेश किटके यांची उपस्थिती होती.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, पूज्य भंते महाथेरो चंद्रमणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरूवात करण्यात आली. प्रोमार्क हाॅस्पिटलचे अश्विनी भांगे, प्रगती काळे, सिस्टर शुभांगी, गोकूल आंबेकर तर याशमे ऑप्टिक वर्ल्डच्या सारिका किटके यांच्या सहकार्याने या शिबीरामध्ये शेकडो नागरिकांनी हृयविकार तपासणी, अस्थी रोग तपासणी, मस्तिष्क तपासणी, नाक, कान, व घसा तपासणी, नेत्र तपासणी, मधुमेह तपासणी, बिपी माॅनेटरिंग, ई.सी.जी तपासणीचा लाभ घेतला. शिबिराचे संचालन आदिती पाॅल यांनी तर आभार अश्विन धनविजय यांनी केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जयभीम काॅ. ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीचे कोषाध्यक्ष प्रदीप ढोबळे, विद्यानंद चहांदे, संतोष कोमलकर, मनोज मेश्राम, माया कांबळे, चंदा गायकवाड, अशोक गवळी, शुभांगी अश्विन धनविजय, अनिकेत जयकर, सुरेंद्र ऊर्फ बाळूभाऊ सातपुते, अनिल पाटील, सुधीर वनकर, चेतन भगत, शैलेश चवरे, निलेश पाटील, पीयूष कांबळे, प्रितेश भगत, राहुल कांबळे, राजू सलामे, शैलेश मानके, टीनू चहांदे, सचिन लिंगायत, राजू नितनवरे, अभय मून, अभय पाटील, हनी पाटील, अरविंद गडपायले यांच्यासह जयभीम काॅ. ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीचे कार्यकत्र्यांचे सहकार्य लाभले आहे. चंद्रमणीनगर, रमाबाई नगर, कुकडे ले आऊट, वसंत नगर, कैलाष नगर, बजरंग नगर, महात्मा फुले नगरातील गरजु नागरिकांना घ्यावा असे आवाहनही मुख्य आयोजक अश्विन धनविजय यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ब्रदर्स कॅफे वर पोलिसांचा छापा

Fri Apr 8 , 2022
नागपुर – पोलीस ठाणे सदर, नागपूर हद्दीतील ब्रदर्स कॅफे, बुटी कॉम्प्लेक्स, हंगरी आईज च्या मागे, माउन्ट रोड, नागपुर येथे  पोलिससाना   मिळालेल्या गुप्त माहिती वरून पो.ठाणे सदर येथील वरिष्ट पोलीस निरीक्षक  विनोद चौधरी यांनी सहकर्मचारी यांचे समवेत सापळा रचुन नियोजित पध्दतीने छापा टाकुन कार्यवाही केली असता. ब्रदर्स कॅफे येथे दोन सोफ्यावर तिन पुरूश ईसम आमोरा समोर बसुन एका टेबलावर प्रतिबंधीत सुगंधीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!