सावनेर – जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस ७ एप्रिल दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय आरोग्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. याच प्रसंगाचे औचित्य साधून स्थानिक लायन्स क्लब सावनेर च्या वतीने नेत्रतपासणी शिबीर स्वामी विवेकानंद वृद्धाश्रम, सावनेर येथे आयोजित करण्यात आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अभिषेक मुलमुले, क्लब सचिव प्रा. विलास डोईफोडे, उपाध्यक्ष किशोर सावल प्रामुख्याने उपस्थीत होते, उपक्रम प्रभारी नेत्रतंत्रज्ञ रुकेश मुसळे यांनी उपस्थितांना डोळ्याच्या काळजीविषयी मार्गदर्शन केले तसेच ४० रुग्णांच्या नेत्रतपासणी करण्यात आल्या.
शिबिरात आवश्यक रूग्णांना मोफत ओषधीवाटप सुद्धा करण्यात आले. उत्तम आरोग्य राखण्याच्या दृष्टीकोनातून सर्वांनी पुरेसा व्यायाम, योग्य आहार आणि ध्यान- योग याकडे सर्वांनी विशेष लक्ष देण्याचे आवाहन प्रा.डोईफोडे यांनी केले. भविष्यात वृद्धान्ना शक्य तेवढी मदतीचे आश्वासन ॲड. अभिषेक मुलमुले यांनी दिले.अधिक्षिका सौ. अनामिक ढिम्बोले यांनी वेळीवेळी वृद्धाश्रमास केलेल्या मदतीबद्दल लायन्स क्लब चे आभार मानले.
सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी चार्टर्ड प्रेसीडेंट वत्सल बांगरे, डॉ. शिवम पुण्यानी, मुसळे आय केअर चे शिवकुमार, अशोक बुधोलीया आणि सर्व क्लब सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्याने नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com