– स्व. धर्मदास भिवगडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिव्यागाना सायकल व छडी साहित्य वाटप.
कन्हान :- दिव्यांग (अपंग) संघटना कन्हान व्दारे दिव्यांग सदस्यता नोंदणी, तपासणी आणि सरकारी योजनेची माहिती व दिशा निर्देश आणि दिव्यांगांचा सत्कार करून स्व. धर्मदास भिवगडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिव्यागाना सायकल व छडी साहित्य वाटप करून जागतिक दिव्यांग दिवस थाटात साजरा करण्यात आला.
मंगळवार (दि.३) डिसेंबर सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दिव्यांग (अपंग) संघटना कन्हान अध्यक्ष अश्विन भिवगडे व्दारे जागति क दिव्यांग दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक राजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक कन्हान यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्याप्रण करून सूरुवात करण्यात आली. यावेळी अथिती म्हणुन बसपा नेता चंद्रशेखर भाऊ भिमटे, नगराध्यक्षा करुणा आष्टणकर, वैध किय प्रभारी हंसराज ढोके, न प गटनेता नगरसेवक मनिष भिवगडे, सामाजिक कार्यकर्ते रिंकेश चौरे,माजी नगरसेवक अजय लौढें आदी प्रामुख्याने उपस्थित होते .
याप्रसंगी दिव्यांग सदस्यता नोंदणी, तपासणी आणि सरकारी योजनेची माहिती व दिशा निर्देश आणि दिव्यांगांचा सत्कार करून स्व. धर्मदास भिवगडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिव्यागाना सायकल व छडी साहित्य वाटप करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना विषयी मान्यवरांनी दिव्यांगांच्या वर्तमान परिस्थि तीवर योग्य असे मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चेतन मेश्राम यानी तर आभार नीतिन मेश्राम यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता आयोजक अश्विन भिवगडे, रोहीत मानवटकर, आनंद चव्हाण, संदीप शेंडे, पुरुषोत्तम रोडेकर, संदीप चिंचोलवार, बलवंत पात्रे, योगेश पात्रे, रंगराव ठाकरे, शुभाष मेश्राम, राजु राऊत, सागर फरकाडे, प्रविण माने, प्रविण शेंडे, नलु गोंडाणे, पुरुषोत्तम रोडेकर, जयेश रामटके, योगेश धावडे आदीने सहकार्य केले.