कामगार कवी लिलाधर दवंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन

– संदीप कांबळे,कामठी

कामठी ता प्र 6:-नुकतेच २०१९ सालचे महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळातर्फे दिल्या जाणारे प्रतिष्ठेचे विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार राज्यातील ५१ कामगारांना जाहीर करण्यात आले. यात कामठी तालुक्यातील आजनी या खेडे गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि बुटीबोरी येथील इंडोरामा सिंथेटिक इंडिया लिमिटेड कंपनीत कार्यरत कामगार कवी लिलाधर दवंडे यांचा समावेश असून सामाजिक, साहित्यिक स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
लिलाधर दवंडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून गावातील गरजू विद्यार्थ्यांसाठी ते निःशुल्क ( कुठल्याही अनुदानावाचून) वाचनालय आणि अभ्यासिका चालवतात.तसेच मार्गदर्शन करतात. रक्तदान, अध्यात्म्य, स्वच्छता अभियान, निसर्ग संवर्धन, शैक्षणिक, क्रीडा ,साहित्य अशा अनेक क्षेत्रात ते विविध उपक्रम राबवितात. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराचे श्रेय ते सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक वृंद, इंडोरामा कंपनी व्यवस्थापण आणि कामगार बंधू, श्री नंदलालजी राठोड सहाय्यक कल्याण आयुक्त नागपूर विभाग, कामगार कल्याण अधिकारी कांचन वाणी, हेमंत जवंजाळ सर, कुटुंबीय, विद्यार्थी, विविध साहित्य समूहातील साहित्यिक, ग्राम पंचायत आजनी, सकाळ वृत्तपत्राचे सतीशजी दहाट, देशोन्नतीचे संदीप दादा कांबळे , सुनील भाऊ चलपे आणि विविध सामाजिक संघटनांना दिले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व मित्र परिवार, कार्यकर्ते, साहित्यिक, वृत्तसेवा, कंपनी स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अमरावती रोडवरील दोन उड्डाणपूलामूळे वाहतूक कोंडी सुटणार

Sun Mar 6 , 2022
– केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन नागपूर – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नागपूर शहरातील अमरावती रोडवर उभारलेले जाणाऱ्या दोन उड्डाणपुलामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असून इंधन तसेच वेळेची बचत होऊन अपघात मुक्त असा प्रवास सुरळीत होणार आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपुरात केले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com