सोमवार पासून कामठीचे तहसीलदार ,नायब तहसीलदारांचे कामबंद आंदोलन..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-कर्मचाऱ्यांच्या संपानंतर पुन्हा कामे खोळंबण्याची शक्यता

कामठी ता प्र 2 :- महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘कामबंद’आंदोलनाला कामठी चे तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी आपला पाठींबा जाहीर केला असून सोमवार 3 एप्रिल पासून बेमुद्दत कामबंद आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

नायब तहसीलदार हे राजपत्रित अधिकारी वर्ग 2 दर्जाचे पद असूनही वेतन मात्र वर्ग 2 चे दिले जात नाही यासाठी नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा ग्रेड-पे लागू करावा ,या प्रमुख मागणीसाठी सोमवार 3 एप्रिल पासून तहसीलदार व नायब तहसीलदार बेमुद्दत कामबंद आंदोलन करणार आहेत.यासंदर्भात महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

सन 1998 साली नायब तहसीलदार पद हे राजपत्रित अधिकारी वर्ग 2 मध्ये समाविष्ट करण्यात आले.परंतु तेव्हापासून आतापर्यंत या वर्गातील अधिकाऱ्यांना वेतन मात्र वर्ग प्रमाणेच दिले जाते .वर्ग 2 चा ग्रेड पे 4 हजार 800 असून नायब तहसीलदारांना ग्रेड पे 4 हजार 300 रुपये एवढ्याच ग्रेड पे वर काम करावे लागत आहे.यासंदर्भात महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने वारंवार शासनाकडे मागणी करून 4 हजार 800 चा ग्रेड पे लागू करण्याची मागणी केली. परंतु शासनाकडुन त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.त्यामुळे नायब तहसीलदारांच्या या न्याय मागणीकडे शासनाचे पुन्हा लक्ष वेधून घेण्यासाठी 3 एप्रिल पासून बेमुद्दत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे .आणि या आंदोलणाला कामठी चे तहसीलदार अक्षय पोयाम, नायब तहसीलदार राजीव बमनोटे,नायब तहसीलदार अमर हांडा आदींचा सहभाग आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अल्प आजाराने अंगणवाडी सेविकेचा मृत्यु.

Sun Apr 2 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 2:-एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कामठी अंतर्गत मागिल काही महिन्यात तीन अंगणवाडी सेविकांचा मृत्यू होण्याच्या घटनेला वीराम मिळत नाही तोच कोळसा टॉल येथील अंगणवाडी केंद्र क्र 19 च्या अंगणवाडी सेविकेचा अल्प आजाराने दुःखद निधन झाल्याची घटना नुकतीच घडली असून मृतक अंगणवाडी सेविकेचे नाव भावना वांद्रे वय 46 वर्षे रा कोळसा टॉल कामठी तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!