संवेदनशीलतेने दिव्यांगांना सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्य करा : मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

– दिव्यांगांच्या विविध योजनांचा घेतला आढावा

नागपूर :- दिव्यांगांप्रति संवेदनशील व्हा आणि त्यांना मनपाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्य करा, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अधिका-यांना दिले.

नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील दिव्यांगांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा शुक्रवारी (ता.८) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त सर्वश्री सुरेश बगळे, विशाल वाघ, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, शिक्षणाधिकारी साधना सयाम, समाजविकास अधिकारी डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, मिलींद मेश्राम, गणेश राठोड, हरीश राउत, घनश्याम पंधरे, पुष्पगंधा भगत, कार्यकारी अभियंता अर्चना पाटणे, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक अभिजीत राऊत आदी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागपूर महानगरपालिकेद्वारे दिव्यांगांसाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती जाणून घेतली. समाजविकास विभाग अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी योजनांची सविस्तर माहिती सादर केली. मनपा तर्फे दिव्यांगसाठी विविध प्रकारची योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. याचा लाभ दिव्यांग बांधव घेत आहेत.

मनपाच्या समाजविकास, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, स्थावर, बाजार, परिवहन अशा विविध विभागांमार्फत या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनांचा सहजरित्या दिव्यांग बांधावांना लाभ व्हावा यादृष्टीने येणा-या अडचणी, त्रुटींची देखील बैठकीत चर्चा झाली. दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगता यावे, त्यांचे जीवन सहज, सुलभ आणि सुकर व्हावे यादृष्टीने मनपाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने संवेदनशीलता बाळगून काम करण्याचे देखील निर्देश यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी रमेश कुलकर्णी

Sat Sep 9 , 2023
नागपूर :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदासाठी दैनिक पुण्यनगरीच्या विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक रमेश कुलकर्णी यांची आज सर्वसंमतीने निवड करण्यात आली. नागपूर विभागीय अधिस्वीकृती समितीची पहिली बैठक जुने सचिवालय येथील माहिती विभागाच्या संचालक कार्यालयात आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस समितीचे सदस्य अविनाश भांडेकर, रमेश कुलकर्णी, नरेंद्र पुरी, शिरीष बोरकर, प्रफुल्ल व्यास तसेच समितीचे निमंत्रक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com