नवी मुंबई,नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पुर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– राज्यातील विमानतळांच्या विकास कामांचा आढावा

मुंबई :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळाचे काम गतीने करून दिलेल्या मुदतीत पुर्ण करावेत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्यातील सर्व विमानतळाच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे फार गरजेचे आहे. देश ५ ट्रीलीयन इकॉनोमी कडे वाटचाल करत असताना, हे क्षेत्र फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे.याक्षेत्रातील बारीक बारीक गोष्टीवर देश आणि राज्याला काम करावे लागणार आहे. या क्षेत्रातील वाढती संख्या विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. सोलापूर आणि कोल्हापूर येथे नाईट लँडिंग होईल, असे नियोजन करा.

शिर्डी नाईट लँडिंग सुविधा लगेच सुरू करा. नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे अडलेले प्रश्न ३१ मार्चपर्यंत सोडवा.

जळगाव येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करा,पुरंदर विमानतळ जागा अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करा.पालघर विमानतळ उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करा अशा सूचना त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,वाढवण बंदर हे केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या १० बंदरापैकी एक हे बंदर असणार आहे. देशातील सर्वात मोठी व्यापारी वाहतूक या ठिकाणाहून होणार आहे.याभागातून बुलेट ट्रेन, कोस्टल रोड जाणार आहे. याठिकाणी चौथी मुंबई साकारणार आहे.यासाठी वाढवण येथे तात्काळ नवीन विमानतळाचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाची चांगली प्रगती असुन अधिक गतीने काम सुरू करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.नवी मुंबई विमानतळ 85% पूर्ण झाले आहे. मुंबई विमानतळापेक्षा दुप्पट क्षमता असणार आहे. कामे गुणवत्तापूर्ण कालमर्यादेत करण्यासाठी प्रयत्न करावा. अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

राज्यातील 11 विमानतळांचा आढावा घेतला 34 प्रशिक्षण विमान/अमरावतीत एअर इंडियाची फ्लाईंग अकॅडमी सुरू होणार. ही आशियातील सर्वात मोठी अकादमी असणार आहे.

ज्या विमानतळावर रात्री विमान उतरण्याची सुविधा आहे. तेथेही काही अडचणी येत असल्याचे समजले आहे.काही विमानतळाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे.उशीर का होत याचे कारणे शोधून लवकरात लवकर मार्ग काढून कामे पूर्ण करावे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी नवी मुंबई, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळांचा सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये झालेले काम , उर्वरित कामासाठी लागणारा कालावधी, प्रलंबित परवानग्या,आर्थिक बाजू, जमीन संपादन अशा विविध भागांचा आढावा घेतला. याबरोबरराज्यातील सर्व विमानतळांचा सादरीकरणाच्या माध्यमातून आढावा घेतला.

यावेळी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सह सचिव रुबिना अली, असंगबा चुबा एओ, सहसंचालक नयोनिका दत्ता, जे. टी. राधाकृष्ण, प्रादेशिक कार्यकारी, भारतीय विमानतळ प्राधिकरण, पश्चिम क्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी फैज अहमद किडवाई, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री सचिवालय तसेच विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, सचिव आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

“एनआईटी में भ्रष्टाचार पर बंटी बाबा शेलके का विरोध: उचित कार्रवाई की मांग”

Tue Jan 7 , 2025
नागपूर :- नागपुर इम्प्रूवमेंट ट्रस्ट (एनआईटी) के अंतर्गत हो रही अनियमितताओं और भ्रष्टाचार के खिलाफ कांग्रेस नेता और समाजसेवी बंटी बाबा शेलके ने आवाज उठाई है। उन्होंने एनआईटी अध्यक्ष को एक विस्तृत ज्ञापन सौंपकर गुंठेवारी अधिनियम के तहत भूखंडों/संरचनाओं के नियमितीकरण, खेल के मैदानों का दुरुपयोग और विकास शुल्क की मनमानी वसूली जैसे मुद्दों पर कार्रवाई की मांग की है। […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!