भाजपा सरकारची कामे, पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडा -प्रदेश प्रवक्त्यांच्या कार्यशाळेत राष्ट्रीय प्रवक्ते खा. सुधांशु त्रिवेदी यांचे मार्गदर्शन

मुंबई :- काँग्रेस सरकारच्या काळात देशात ठिकठिकाणी होणाऱ्या बॉम्बस्फोटांचे प्रकार आता थांबले आहेत. केंद्रातील एनडीए सरकारने आणि राज्यातील महायुती सरकारने देश आणि राज्याच्या विकासाचे, जनहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. प्रवक्त्यांनी आपल्या सरकारची कामे, पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, असा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. सुधांशु त्रिवेदी यांनी गुरुवारी दिला. भाजपा प्रदेश प्रवक्ते आणि जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या कार्यशाळेत खा. त्रिवेदी बोलत होते. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल, आ. अतुल भातखळकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, राष्ट्रीय माध्यम समन्वयक के. के. उपाध्याय, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.

खा. त्रिवेदी म्हणाले की, विकास हा केंद्रबिंदू ठरवत भाजपा सरकारने देशात आणि राज्यात अनेक महत्वाचे, दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले आहेत. जोपर्यंत प्रवक्ते आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून आपण हे मुद्दे मतदारांसमोर मांडणार नाही तोवर ते तळागाळापर्यंत पोहोचणार नाहीत. मतदारांना सरकारची धोरणे कळण्यासाठी, पक्षाची बाजू व काम प्रभावीपणे मांडले पाहिजे.

के. के. उपाध्याय यांनी प्रसारमाध्यमांच्या बदलत्या स्वरूपाबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की पत्रकारांशी बातचीत करताना आपण पक्षाच्या वतीने बोलत आहोत, याचे भान ठेवणे महत्वाचे असते. निवडणूक प्रचारादरम्यान प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियामार्फत सरकारच्या, पक्षाच्या कामांचा तपशील जनतेसमोर मांडता येईल, असे प्रेम शुक्ल यांनी सांगितले.

भाजपा माध्यम विभागाचे केंद्रीय समन्वयक आ. अतुल भातखळकर यांनी सांगितले की, प्रवक्त्यांनी सरकारने केलेली कामे प्रसारमाध्यमांच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवताना त्यासंदर्भात संपूर्ण अभ्यास करावा. पुढील एक महिना प्रचाराच्या दृष्टिने अतिशय महत्वाचा असून सर्व प्रवक्ते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी एकाच दिशेने नियोजनपूर्वक काम करावे, अशी सूचना प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

RabiesMuktNagpur: A Game Changing Win in the Fight Against Rabies - 20,392 dogs vaccinated!

Thu Oct 17 , 2024
Nagpur :- In a groundbreaking achievement, the Nagpur Municipal Corporation, in partnership with Mission Rabies, has exceeded its target in the ongoing #RabiesMuktNagpur initiative. The Campaign concluded with 20,392 dogs been vaccinated against rabies, surpassing the original goal of 15,000 dogs within just 15 days of the campaign itself. This mass dog vaccination drive, launched on September 1st, and culminated […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com