नागपूर :- गणेश टेकडी मंदिरात आज दिनांक 22 मे रोजी महिला सेविकांनसाठी खूप भाग्याची व आनंदाची बाब आहे की गणेश टेकडी मंदिरात सर्व महिला सेविकांना महालक्ष्मी प्रसादाच्या रूपात साड्या व इतर वस्तू व फळे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव श्रीराम बापूराव कुलकर्णी, सहसचिव अरुण गोविंदराव व्यास आणि कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. त्यावेळी शशी तिवारी यांचे सहयोग लाभले.