संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी.
-कामठी पंचायत समिती सभागृहात नवनिर्वाचित जि. प सभापती अवंतिका लेकुरवाळे याचा सत्कार समारंभ …. ..
कामठी ता प्र 5 :- केंद्रात व राज्यात जरी काँग्रेस पक्षाची सत्ता नसली तरी सध्या जिल्हा परिषद नागपूर येथे महाविकास आघाडीची पूर्ण बहुमताची सरकार असून मी नागपूर जिल्हा परिषद येथे महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती म्हणून निवडून आले. काँग्रेस पक्षश्रेष्ठी व माजी राज्यमंत्री सुनील केदार, काँग्रेस पक्षाचे नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक , कामठी विधानसभा क्षेत्राचे आमचे नेते माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तळा न जाऊ देता जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाच्या संपूर्ण एकूण एक योजना जिल्ह्यातील समाजातील सर्व गरजू लोकांना लाभ मिळवून आपल्या निवड सार्थक असल्याचे सिद्ध करण्याचा व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या लोकहिताच्या संपूर्ण योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या आपला मानस असल्याचे प्रतिपादन नागपूर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित महिला व बालकल्याण सभापती प्रा अवंतिका लेकुरवाळे यांनी कामठी पंचायत समिती येथील सभागृहात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या अध्यक्षतेत आयोजित आपल्या सत्कार समारंभ कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले. या सत्कार समारंभ कार्यक्रमात कामठी पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती दिशाताई चनकापुरे, उपसभापती दिलीप वंजारी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला .प्रसंगी माजी जि प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शासकीय योजना ह्या गरजू जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी निर्वाचित पदाधिकाऱ्यांची असते .इच्छाशक्ती व जवाबदारीने आमचे नवनिर्वाचित जी प व प स पदाधिकारी काटेकोरपणे अग्रेसर राहून कामे करतील यात काहीही दुमत नाही .
कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्याने पं स सभापती दिशा चनकापुरे, उपसभापती दिलीप वंजारी, माजी उपसभापती आशिष मल्लेवार, प स सदस्य सुमेध रंगारी, सोनू कुथे, प्रभारी गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले, पशुसंवर्धन अधिकारी लिना पाटील, पंचायत विस्तार अधिकारी .शशिकांत डाखोळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सदाशिव राठोड,अक्षय मंगरुळकर ,गणेश पिंपळे व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आरोग्य विस्तार अधिकारी गोपीचंद कातुरे यांनी केले व आभार प्रदर्शन सांख्यिकी विस्तार अधिकारी मोहाळीकर यांनी केले.