गुरूंचे आशीर्वाद घेऊन धर्मपाल मेश्राम यांनी दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

नागपूर: जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाविद्यालयातून शिक्षणासह आयुष्यातील अनेक पैलूंसाठी मार्गदर्शन ठरणारे धडे देणा-या गुरूंचे आशीर्वाद घेऊन ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सर्व प्राध्यापिकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिवंगत गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ लॉ येथे भेट देऊन सर्व प्राध्यापिकांचे आशीर्वाद घेतले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्नेहल फडणवीस, डॉ. अर्चना सुके, डॉ. नंदिता गायकवाड, डॉ. रोहिणी फुलाडी, श्रीमती वैशाली शिवणकर, श्रीमती अरुणा कडू, श्रीमती विशाखा बागडे आदी सर्व प्राध्यापिकांना त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

स्त्री ही मुळात सक्षम आहे. तिच्यात नेतृत्वाची क्षमता आहेच शिवाय ती दिशादर्शकही आहे. बालपणापासून ते शेवटपर्यंत स्त्री प्रत्येक रूपात दिशादर्शकाची भूमिका निभावते. आयुष्यातील महाविद्यालयाचा महत्वाचा टप्पा काही स्त्रियांनी समृध्द करीत जीवनाला कलाटणी देण्याचे कार्य केले. त्यांनी दाखविलेला मार्ग सुकर करण्यासाठी त्यांचेच विचार प्रेरणा देतात. या सर्व महिलांना शुभेच्छा देत त्यांच्याप्रति यानिमित्ताने कृतज्ञता व्यक्त करीत असल्याची भावना यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिवाजी क्रीडा संकुलात महिलांसाठी झुंबा व एरोबिक्सवर थिरकल्या महिला

Thu Mar 10 , 2022
भंडारा : जिल्ह्यात आज महिला शक्तीच्या जागराचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा द्वारे छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा अविनाश पुंड यांचे मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आहे.             आरोग्यविषयक जागरूकतेसाठी सकाळी 7.00 ते 9.00 वा रिदम फिटनेसचे संचालक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com