पोलिसांच्या आशीर्वादाने कामठीच्या जुगार अड्याला परवानगी..!

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 19 :- कामठी शहरातील दिग्गजांवर पोलीस कारवाहीचा दणका बसला असून शहरातील बच्चा बच्च्याच्या तोंडावर सी पी अमितेशकुमार व डीसीपी राजमाने यांचे नाव ओठी बसले आहे तर काही अवैध व्यावसायिकांनी गप्प बसण्यातच धन्यता मानली मात्र काही भामट्यावर नमूद असलेल्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्याची कुठलीही भीती नसल्याने स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या काही भ्रष्ट पोलिसांना हाताशी धरल्याने पोलिसांना देत असलेल्या चिरीमिरोमुळे कामठी शहरातील रामगढ, रामानगर, खलाशी लाईन सह इतर ठिकाणी जुगार अड्डा बिनधास्त पने सुरू असून पोलिसांची कुठलीही भीती राहिलेली नाही तसेच पोलिसांच्या अभयपणामुळेच कामठी शहरातील रमानगर, रामगढ येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्याला जणू काही परवानाच मिळाला की काय?असे वाटते तर हेच गुन्हेगारी वृत्तीचे लोक बिनधास्तपणे पोलिस स्टेशन ला हजेरी लावून बोलणी करून जातात त्यामुळे सी पी अमितेशकुमार व डीसीपी राजमाने यांच्यासारखे कितीही प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी आपले नाव उंचावत कायद्याचे राज्य निर्माण करीत असले तरी येथील काही भ्रष्ट पोलिसांमुळे यांच्या या कार्यप्रणालिवर पाणी फेरत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा

Tue Sep 20 , 2022
राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई  :- राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com