चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत स्वच्छ भारत २०२३ अभियानांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे विजेते घोषीत करण्यात आले असून लवकरच त्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. जिंगल, पथनाट्य,म्युरल आर्ट, शॉर्ट मुव्ही, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिंगल स्पर्धेत प्रथम नंदराज जीवनकर, द्वितीय अभिषेक कपूर, तृतीय क्रमांक प्रतीक रामटेके यांनी प्राप्त केला आहे. त्याचप्रमाणे पथनाट्य स्पर्धेत प्रथम सुमेधा श्रीरामे ग्रुप ,द्वितीय सावित्रीबाई फुले शाळा, तृतीय बक्षीस कविता कुर्रेवार ग्रुप, म्युरल आर्ट स्पर्धेत प्रथम लोकमान्य टिळक शाळा, द्वितीय अंजली साठवणे, तृतीय निलेश मल्लेलवार, शॉर्ट मुव्ही स्पर्धेत प्रथम मुग्धा खांडे, द्वितीय माउंट कार्मेल शाळा, तृतीय प्रज्ञा गंधेवार,निबंध स्पर्धेत ग्रुप अ मध्ये प्रथम कोमल चिलकेवार, द्वितीय जान्हवी बिसेन, तृतीय अनिसा यादव, ग्रुप ब मध्ये प्रथम कुमुशी रामटेके, द्वितीय रेवती गणभेळे, तृतीय प्राची खारकर, चित्रकला स्पर्धेत ग्रुप अ मध्ये प्रथम पलक मालाधारी, द्वितीय अलिना खान, तृतीय श्रुती मेश्राम, ग्रुप ब मध्ये प्रथम अविनाश नन्नावरे,द्वितीय निर्मिती लुलु तर तृतीय क्रमांक नोकीता शाहू यांना मिळाला आहे.