पंतप्रधान मोदी यांच्या सभेकरिता फुटपाथ दुकानदाराना बेरोजगार करणार का ?

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– कन्हान हॉकर्स युनियन कन्हान कृती समिती व्दारे पत्रकार परिषदेत आरोप. 

कन्हान :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेकरिता ग्रोमोर वेंचर प्रा. लि. (पूर्वीची हिंदुस्थान लिव्हर कंपनी) ची जमीन समतल केल्यामुळे कन्हान नगरपरिषद प्रशासनाने कंपनीच्या भिंतीलगत असलेल्या छोट्या दुकानदारांना अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्याने खळबळ उडाली आहे. हे दुकानदार बेरोजगार होऊन त्यांच्या परिवाराचा उदरनिवाहाचा प्रश्न उभा ठाकल्या ने कन्हान हॉकर्स युनियन कन्हान कृती समिती व्दारे पत्रकार परिषदेत दुकाने न हटवुन न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

ब्रुक बाँडच्या कम्पनीच्या भिती लागत मागिल ३० ते ३५ वर्षापासुन दुकान लावुन दुकानदार छोटे व्यवसाय करित आहेत. दिनांक २०/०६/२०२० कन्हा न नगरपरिषदेने या दुकानदाराना सुचना पत्र देऊन आपण अवैधरित्या येथे दुकान लावले असुन लवकरा त लवकर लावलेले दुकान स्वः खर्च्याने हटविण्याची कार्यवाही करावी. या नोटीसाचा आधार घेत दुकानदा रानी उच्च नायालयात धाव घेतली असता तेथुन जैसे थे (स्टे) मिळालेला होता. त्यानंतर दुकाना मागे असले ली ब्रुक बाँड चि जागा ही ग्रोमोर वेंचर द्वारे खरेदी कर ण्यात आली. ग्रोमोर वेंचरच्या मालकाला आपल्याला मनमरजेची किंमत मिळण्याकरिता आमच्या दुकाना मुळे अडचण निर्माण होत असल्याने आम्हाला हटवा यचे कसे ? तो विचार करू लागले आहे. लोकसभेचे निवडणुक घोषित झाल्यानंतर भारताचे मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा घेण्याआड सुरक्षेचा दृष्टि कोनाचा बहाणा करून आमचा काटा काढण्याचा त्या नी ठरविले असावे. यामुळे (दि.०४) एप्रिल २०२४ ला पुन्हा आम्हाला मा. उच्च न्यायालयाचे स्टे असुन सुद्धा कंटेम्पट ऑफ कोर्ट ची कार्यवाहीची परवाह न करता कन्हान नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी पुन्हा नोटीस बजावुन ३ तासाचा आत आपण केलेले अतिक्रमण हटवावे तसे न केल्यास शासनाला लागणारा पैसा आपल्या कडुन वसुल करण्यात येईल असे नोटीस मध्ये स्पष्ट उल्लेख आहे. प्रकरणाची दखल घेऊन मा. वकिलांनी आम्हा ला मा. उच्च नायालयाकडुन स्टे मिळवुन दिला होता. त्यांनी कंटेम्पट ऑफ कोर्ट केल्या चे नोटीस कन्हान नगरपरिषद, पोलीस निरीक्षक पोस्टे कन्हान, तहसिल कार्यालय पारशिवनी, जिल्हाधिकारी कार्यालय नागपुर हयाना ईमेल वर नोटीस पाठविण्या त आला असुन सुद्धा आजही नगरपरिषद प्रशासन ह्याच प्रयत्नात आहेत कि गोमोरे वेंचर च्या व्यावसायि कांना कसा फायदा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या कसा व्हावा याचीच योजना आखली जात आहे. 

दुकानदारांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन न्यायालयाचा आदेश मांडला. यानंतर सभेसाठी याचि काकर्त्याची २५ दुकाने वगळता सर्व दुकाने तात्पुरत्या स्वरूपात हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र सभेसाठी कोणाची दुकाने काढली जाणार, सभेनंतर त्याच ठिकाणी दुकाने थाटण्याची जबाबदारी कोणाची ? हे संशयास्पद आहे. त्यामुळे कोणाची दुकाने काढ ली जाणार याबाबत दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बैठकीनंतर ग्रोमोर कंपनीचे लोक या दुका नदारांना त्या जागेवर दुकाने थाटायला देणार की नाही ? नवीन पोलीस स्टेशन प्रशासकीय इमारत आणि न. प. नविन इमारतीला दुकानांच्या अतिक्रमणांनी वेढले असतानाही त्यांना कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. यामुळे खळबळ उडाली आहे. हे दुकानदार बेरोजगार होऊन त्यांच्या परिवाराचा उदरनिवाहाचा प्रश्न उभा ठाकल्याने कन्हान हॉकर्स युनियन कन्हान कृती समिती व्दारे पत्रकार परिषदेत दुकाने न हटवुन न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया –

मुख्याधिकारी – रविंद्र श्रीराम राऊत 

नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या एका कडेला २५-३० वर्षा पासुन अति क्रमण करून दुकाने बनवले आहे. त्यांची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने प्रशासन यात हस्तक्षेप करणार नाही. सध्या कसल्याही सुचना वरून आलेल्या नाहीत.

पोलीस निरीक्षक उमेश पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या सुरक्षे साठी फुटपाथवर असलेले दुकानदारांना स्व:ता खाली करण्यास सांगितले आहे. फुटपाथवरील दुकानदारांचे प्रकरण न्यायलयीन असल्याने प्रशासन हस्तक्षेप करणार नाही.या व्यतिरिक्त लोकांना ये जा करण्या करिता होम पाईप कंपनीचा पंटगणातुन व्यवस्था कर ण्यात आली आहे. तसेच बस स्थानका पासुन मोकळ या जागेवर गेटची व्यवस्था करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कांद्री, कोंढाळी आणि घारतवाडा गावात जनसंवाद अभियानाचे जल्लोषात स्वागत

Tue Apr 9 , 2024
रामटेक :-महायुतीचे उमरेडचे माजी आमदार तसेच महायुतीचे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार राजू देवनाथ पारवे यांच्या काटोल विधानसभा क्षेत्रातील जनसंवाद अभियान कांद्री, कोंढाळी आणि घारतवाडा ह्या गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जनसंपर्क पदयात्रा आणि कॉर्नर सभेचे आयोजन गावात करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे आणि भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी गावातील समस्या जाणून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com