शाहिरांच्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेणार : सुधीर मुनगंटीवार.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

नागपूर दि. 20 डिसेंबर –  राज्यातील शाहिरांच्या समस्यांची शासनाला जाणीव असून त्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेत मार्ग काढला जाईल. अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्य विघिमंडळाच्या अधिवेशनात मोर्चा घेऊन आलेल्या भारतीय कलाकार शाहीर मंडळ आणि महाराष्ट्र शाहिर परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते.

यावेळी बोलतांना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की महाराष्ट्राच्या संस्कृतीत शाहिरांचे मानाचे स्थान आहे. महाराष्ट्राचा इतिहास गावागावात लोकांच्या मनात जीवंत ठेवण्याचे काम शाहिरांनी केले आहे. अशा शाहिरांकडे शासन दुर्लक्ष करणार नाही. मात्र अनुदानाच्या मदतीवर शाहिरांनी अवलंबून राहू नये तर त्यांना काम देता यावे असा शासनाचा प्रयत्न आहे. शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या प्रसिद्धी प्रसाराच्या कामी शाहिरांची कला कशी वापरता येईल याची शहानिशा करीत आहोत असे त्यांनी शाहिरांच्या प्रतिनिधी मंडळाला सांगितले.

कोरोना काळात कलाकारांना मदत देण्याची घोषणा तत्कालीन सरकारने केली. मात्र त्यासाठी माहिती गोळा करण्याचे काहीही काम तत्कालीन सरकारने केले नाही. त्यामुळे कलाकारांना तेव्हा मदत मिळू शकलेली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळेच आता आपण राज्यातील कलाकारांचा डेटाबेस तयार करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत असे सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

शाहीर कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून मनोरंजन करीत जनजागृती व समाजप्रबोधन करीत असतो. आज या कलावंतांची परिस्थिती हालाखीची झाली आहे. त्यामुळे आपल्या विविध मागण्यांसाठी भारतीय कलाकार शाहीर मंडळ व महाराष्ट्र शाहीर परिषदने विधानभवनावर मोर्चा काढला. शाहीर व कलावंतांनी वेशभुषेसह आपल्या पारंपारिक नृत्य सादर केले. वृद्ध कलावंतांच्या मानधन 10,000 करण्यात यावी. जिल्हा मानधन समितीमध्ये 100 अर्ज बैठकीमध्ये पात्र करतात ते 300 करण्यात यावे, मानधन वय 50 वर्ष आहे ती 40 वर्ष करण्यात यावी,लोक कलावंतांना आरोग्य सेवा मोफत करण्यात यावी, उत्पन्नाची मर्यादा ५० हजारावरून २ लाख रुपये करण्यात यावी, कलावंत यांना 10,00,000 रुयांपर्यंतच्या विमा काढावा,कलावंतांना शासनातर्फे ओळखपत्र देण्यात यावे, अश्या 21 मागण्या चे निवेदन मुनगंटीवार यांना देण्यात आले .

या‌‌ शिष्टमंडळात महाराष्ट्र शाहिर परिषदेचे हितचिंतक भारतीय कलाकार शाहीर मंडळ आणि महाराष्ट्र शाहिर परिषदेचे पदाधिकारी शाहिर राजेंद्र भीमराव बावनकुळे, डॉ संजय बजाज, भगवान लांजेवार, कवी ज्ञानेश्वर वांढरे, अंबादास नागदेवे, नरहरी वासनिक, दीपमाला मालेकर, गणेश देशमुख,वसंता कुंभरे, अरूण मेश्राम , चिरकुट पुंडेकर आदी उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांच्यासह काही प्रमुख अधिकारीही उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

'महानिर्मिती'च्या अभियंता पदासाठी अधिवास प्रमाणपत्र अत्यावश्यक - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Wed Dec 21 , 2022
नागपूर : राज्य शासनाच्या अंगीकृत वीज वितरण, महानिर्मिती कंपनीमध्ये कनिष्ठ व सहायक अभियंता पदाच्या भरतीची जाहिरात महानिर्मिती कंपनीमार्फत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील गट अ आणि ब वर्गासाठी अधिवास प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. याबाबत ५ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे. तसेच सेवा प्रवेश नियमात ही सुधारणा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. याबाबत सदस्य चेतन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!