प्रत्येक मराठी माणसाचा योग्य मान-सन्मान ठेवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई :-  कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र हा ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात मांडण्यात आलेली माहिती तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा संबंधित अधिकारी कितीही मोठा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा ‘मान-सन्मान’ राज्यात ठेवला जाईल”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्य सरकारची भूमिका मांडली. राज्यातल्या जनतेला आश्वस्त करत, या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.

कल्याण येथील योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला मारहाण आणि अन्यायाची बाब ‘पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन’च्या माध्यमातून आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

CM FADNAVIS ANNOUNCES STRICT ACTION AGAINST CRIMINALS IN BEED; JUDICIAL AND SIT PROBE ORDERED

Fri Dec 20 , 2024
Nagpur :- Chief Minister Devendra Fadnavis today announced comprehensive measures to address the recent incidents in Beed and Parbhani districts, emphasizing zero tolerance for criminal activities. Speaking in the Legislative Assembly, the Chief Minister ordered dual investigations and announced compensation for the victims’ families. Key Actions Announced : 1. Investigation and Legal Action: – Dual probe ordered for Beed incident: […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!