गोंदिया वनविभागांतर्गत गोरेगाव वनपरिक्षेत्रात वाहनाच्या धडकेत वन्यप्राणी वाघाचा मृत्युबावत

गोंदिया :- गोंदिया वनविभागातील गोरेगाव वनपरीक्षेत्रातील सहवनक्षेत्र पिंडकेपार नियतक्षेत्र पालेवाडा मधील कक्ष क्र. ४१९ वनक्षेत्रातून जाणाऱ्या कोहमारा-गोंदिया राज्य मार्गावर मुरदोली गावाजवळ दिनांक १०:०८,२०२३ रोजी रात्री ०९:३० वाजताच्या सुमारास वाहनाच्या धडकेमुळे अपघात होवून १ नर वाघ गंभीर जखमी झाल्यामुळे मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार गोंदिया वनविभाग तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदियाचे जलद बचाव दल तसेच क्षेत्रीय कर्मचारी यांचे मदतीने वाघास बेशुध्द करून दिनांक ११.०८.२०२३ रोजी सकाळी ०७:३० वाजता जेरबंद केले.

सदर वाघास पुढील उपचारासाठी वन्यजीव बचाव केंद्र, गोरेवाडा, नागपूर येथे स्थलांतरीत करताना कोहमारा जवळ सदर वाघाचा मृत्यु झाला. सदर वाघास शवविच्छेदनाकरीता वन्यजीव बचाव केंद्र, गोरेवाडा, नागपूर येथे आणण्यात आले. डॉ. रोहिनी टेंभुनें, पशुवैद्यकीय अधिकारी, (अपर प्रधान मुख्य वन्यसंरक्षक (वन्यजीव) पूर्व), डॉ. सुजित कोलंगथ, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडा), डॉ. शालिनी ए. एस. पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडा) व डॉ. अनिकेत चिचामे, (पशुवैद्यकीय अधिकारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र) यांनी सदर मृत वाघाचे शवविच्छेदन केले.

त्यानंतर प्रमोदकुमार पंचभाई, उपवनसंरक्षक, गोंदिया वनविभाग, शतानिक भागवत, विभागीय व्यवस्थापक, गोरेवाडा, श्रावण बाहेकर, मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनीधी, अनिल दशहरे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरण यांचे प्रतिनीधी, अजिंक्य भटकर, मानद वन्यजीव रक्षक यांच्या समक्ष सदर वाघाचे शव दहन करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अभय पुंडलिक जैसा महाठग निकला अनिरुद्ध, BJP के बड़े नेताओं के नाम पर ठगे करोड़ों 

Sat Aug 12 , 2023
– नागपुर, मुंबई, पुणे में 100 से ज्यादा को ठगा नागपुर :- सिटी से जुड़े ऐसे महाठगों की लिस्ट लंबी होती जा रही है जो राज्य और केंद्र सरकार के सत्ताधारी पक्ष के नेताओं से करीबी संबंध और स्वयं को किसी विभाग का बड़ा अधिकारी बताकर करोड़ों ठगकर छू मंतर हो गये. हालांकि कानून के लंबे हाथ इन्हें धर दबोच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com