संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- वेकालि इंदर व कामठी कोळसा खुली खदान अंतर्गत ईगल इन्फास्ट्रक्टर्चर प्रा. लि. खाजगी कंत्राटदार कडे काम करण्यास बाहेरून आणलेल्या कामगाराचे व्हीटीसी व मेडीकल करण्यात आले. परंतु स्थानिय कामगाराचे का नाही ? यास्तव शिवसेना भारतीय कामगार सेनेच्या शिष्ट मंडळा व्दारे निवेदन देऊन स्थानिय कामगारांचे त्वरित व्हीटीसी व मेडीकल करण्याची मागणी केली असुन न केल्यास आंदोलना चा इशारा शुध्दा देण्यात आला आहे.
वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत इंदर व कामठी कोळसा खदान मध्ये ईगल इन्फास्ट्रक्टर्चर प्रा. लि. या खाजगी कंपनी कंत्राटदाराने काम करण्यास बाहेरून आणलेल्या कामगाराचे व्हीटीसी व मेडीकल केले. परंतु स्थानिय कामगाराचे केले नसुन यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. असा भेदभाव का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे स्थानिय कामगारावर कंपनी अन्याय करित असल्याने शिवसेना भारतीय कामगार सेना जिल्हा प्रमुख समीर मेश्राम यांचे नेतुत्वात शिष्टमंडळा व्दारे ईगल इन्फास्ट्रक्टर्चर खाजगी कंपनी मँनेजर हेंमत उचले हयाच्याशी चर्चा करून निवेदन देऊन आपल्या कंपनीत काम करण्या-या स्थानिय कामगारांचे त्वरित व्हीटीसी व मेडीकल करण्याची मागणी केली आहे. मागणी पुर्ण न झाल्यास कंपनी विरोधात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा शुध्दा देण्यात आला आहे. या प्रसंगी शिष्टमंडळात शिवसेना भारतीय कामगार सेना जिल्हाप्रमुख समीर मेश्राम, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष पारशिवनी तालुका संघटक गणेश मस्के, वाहतुक सेना रामटेक विधानसभा अध्यक्ष सावन लोंढे, अंकुश बचले, आदित्य जांभुळकर सह शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.