येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आरक्षण का नाही? हि तर महिलांची दिशाभूल – प्रदेश सरचटणीस ॲड.नंदा पराते

मुंबई :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदमध्ये सर्व पक्षीय समर्थनाने मंजूर झाला. भाजप सरकारने ओबीसी महिलांना आरक्षणाबाहेर ठेऊन मानसिकता दाखविली. सन २०१० मध्ये काँग्रेसने सरकारने महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर केले ,त्यावेळी भाजप ने विरोध केला. खऱ्या अर्थाने मोदी सरकारला महिलांना आरक्षण द्यायचे नाही तर निवडणूक प्रचारात वापर करायचे आहे. भारताची जनगणना व मतदारसंघ फेररचना निश्चित नाही म्हणजेच महिलांना आरक्षण मिळण्यापूर्वीच वाद-विवाद उभा करण्याचा प्रयत्न आहे.

सन २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांना आरक्षण लागू करण्यासाठी संसदेत काँग्रेस पक्षाने समर्थन दिले. लोकशाही मजबूत करण्यासाठी काँग्रेसने एक पाऊल समोर टाकून ओबीसी महिलांना निवडणुकीत आरक्षण करण्याची मागणी संसदेत केली पण भाजपने धुडकावून लावली. मोदी सरकारची ओबीसी बाबतची असलेली मानसिकता दिसली. महिलांची दिशाभूल करून राजकारणासाठी भाजप राजकारण करणार आणि निवडणुकीत महिलांना आरक्षणाचे झुनझुने दाखविणार पण महिला आता दिशाभूल होणार नाही. इंडिया आघाडी सत्त्तेवर येईल आणि महिलांना संविधानानुसार वाढीव आरक्षण लागू करेल तेव्हा भाजपचे आरक्षण विरोधी भूमिकेला लगाम लागेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकऱ्यांना मिळणार 'रासायनिक व सेंद्रीय खते - मंत्री संदिपान भुमरे

Fri Sep 22 , 2023
मुंबई :- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ‘ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबीऐवजी या वर्षी ‘रासायनिक व सेंद्रीय खते देणे’ ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. मंत्री भुमरे म्हणाले की, भाऊसाहेब फुंडकर फळबाग या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरिताचे अनुदान केंद्र पुरस्कृत ‘राष्ट्रीय योजना प्रति थेंब […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!