संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
आक्रोश मोर्चा सरकारला फेरविचार करायला बाध्य करेल
कामठी :- अंबाझरी स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक व स्मारकाची 20 एकर जागा मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे, स्मारक उध्वस्त करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे या मागण्यांसाठी मागील 66 दिवसांपासून महिलांचे सतत लक्षवेशी आंदोलन सुरू असूनही शासन मागण्यांकडे लक्ष देत नाही म्हणून डॉ बाबासाहेब सांस्कृतिक भवन बचाव कृती समितीने नागपुरात प्रत्येक विभागात तीन दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून दक्षिण नागपुरात तीन दिवसीय धरणव आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस होता. दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. अनेक मान्यवरांनी धरणे आंदोलनाला भेट देऊन समर्थन जाहीर केले. डॉ प्रदिप आगलावे, गायक अनिरुद्ध बनकर, राजू लोखंडे इ. नी भेट दिले. दिवसभराच्या आंदोलनानंतर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
अतिशय शिस्तबद्ध असा भव्यमोर्चा निघाला, मोर्चात सहभागी प्रत्येक व्यक्तीच्या मनात सरकार विषयी चीड दिसत होता. या मोर्चाने सरकारला फेरविचार नक्की करावा लागेल. आक्रोश मोर्चाचे चंद्रमनीनगर मैदानात जाहीर सभेत रूपांतर झाले. जाहीर सभेला प्रा रणजित मेश्राम यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. शासनाने स्मारक पाडण्याचा कट केला असा गंभीर आरोप केला. डॉ धनराज डहाट आमचा आवाज मुंबईत सुद्धा बुलंद करू म्हणाले. आंदोलनाचे व सभेचे अध्यक्ष स्थान कृती समितीचे अध्यक्ष किशोर गजभिये यांनी केले. प्रास्ताविक डॉ सरोज आगलावे यांनी तर आभार प्रदर्शन उज्वला गणवीर यांनी केले. अब्दुल पाशा, ज्योती आवळे यांनी सुद्धा विचार व्यक्त केले. जाहीर सभेचे संचालन प्रदीप मुन यांनी केले.
कृती समितीचे सुधीर वासे, डॉ सरोज डांगे, राहुल परुळकर, डॉ. उरकुडे, जनार्दन मून, तक्षशीला वागधरे, छाया खोब्रागडे, पुष्पा बौद्ध, सुगंधा खांडेकर उषा बौद्ध, सुषमा कळमकर, राजेश गजघाटे तर दक्षिण नागपुरातील प्रमोद मुन, सुधाकर स्थूल, रंजना वासे, बबन वासे, विशाल आर्यबोधी, विनोद हजारे, जयश्री गणवीर ज्योती खोब्रागडे, सोनटक्के, इ.नी आंदोलन व जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.