वादग्रस्त ठरत असलेल्या शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य अर्चना भोयर ने थानेदार व पारशिवनी गट विकास अधिकार्यांना दिले निवेदन.
पारशिवनी :- पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कार्यरत असलेल्या नरेश उराडे हे अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या विरोधात शाळा व्यवस्थापन समिती. पालक व ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी व पोलीस स्टेशन पारशिवनी येथे निवेदन देऊन तात्काल कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
पारशिवनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक नरेश उराडे हे ज्यां दिवसी या शाळेत रूजू झाले त्या दिवशी पासून विविध कारणांनी वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या असभ्य वर्तनाचा फटका शाळेच्या प्रतीष्ठेवर, शालेय विद्यार्थ्यांवर पालक, व शाळा व्यवस्थापन समिती वर पडला असल्याने पारशिवनी गट विकास अधिकारी सुभाष जाधव व पोलीस स्टेशन पारशिवनीला तक्रारी व निवेदन दिले. पालक रवी नवले, राजकुमारी दाते, मुकेश ढेकले, देवराव सावरकर, या विद्यार्थ्यांच्या पालकांनी गट शिक्षणाधिकारी व शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक यांच्या कडे लेखी तक्रारी देऊन शिक्षक नरेश उराडे यांनी मुलाला मारहाण केली. शाळेत जाऊन मी चौकशी केली असता शिक्षक नरेश उराडे यांनी माज्याशी असभ्य व उध्दट भाषेत बोलत तुमच्या मुलाला दवाखान्यात किती खर्च आला तो मी देतो. अशा पध्दतीने बोलत मला अपमानास्पद वागणूक दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकुमारी दाते यांनी सुध्दा मुलाला सतत शिक्षक नरेश उराडे मारहाण करत असल्याने आमचे मुले दहशदित आहे. त्यामुळे ते शाळेत जायला तयार नाही. अश्या प्रकारच्या अनेक पालकांनी तक्रारी केल्या आहेत.
तर दिंनाक ६/९/२०१८ ला शालेय पोषण आहार शिजवून वाटप करण्याकरिता चार महिला मदतनिस आहे. या महिलांना शिक्षक नरेश उराडे यांनी अश्लील व असभ्य शब्दांत बोलुन सदर महिलांना अपमानास्पद वागणूक दिली असल्याची तक्रार पारशिवनी पंचायत समिती गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आली होती.
या तक्रारीची दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पारशिवनी यांनी शिक्षक नरेश उराडे यांना दिंनाक ५/१०/२०१८ ला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांत नरेश उराडे यांनी शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनिस महिलांना अपशब्दांचा वापर केला. सहकारी शिक्षकांशी बोलताना असभ्य भाषेचा वापर केला. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचेशी उध्दटपणे बोललात हि बाब शिक्षक म्हणून योग्य नाही. त्यामुळे आपण खुलासा करावा असे पत्र दिले होते.
शिक्षणाधिकारी प्राथमिक व गट विकास अधिकारी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांच्या पत्रकानुसार चौकशी समिती नेमली
वादग्रस्त ठरत असलेले शिक्षक नरेश उराडे यांच्या असभ्य व उध्दट वागणूकी बाबत व स्वयंपाकी मदतनिस महिलांना अपशब्दांचा वापर करून अपमानास्पद वागणूक दिली यांची चौकशी करण्या करीता. अनिता काळे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, कैलास लोखंडे शिक्षण विस्तार अधिकारी वंगरूळकर विस्तार अधिकारी कृषी व योगेश ठाकरे केंद्रप्रमुख या चार अधिकाऱ्यांची समिती गठीत केली होती.
या समितीने चौकशी करून अहवाल सादर केला असून वादग्रस्त शिक्षक नरेश उराडे यांच्या विरोधात असलेल्या तक्रारी ह्या सत्य असुन शिक्षक नरेश उराडे सहाय्यक शिक्षक यांनी बोलतांना अपशब्दांचा वापर केला आहे. शालेय परीसरात बोलताना भान ठेवणे अपेक्षित असतांना त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे शिक्षक नरेश उराडे यांनी भविष्यात वर्तणुकीत सुधारणा करणे अपशब्दांचा वापर न करणे पदाधिकारी, पालक यांच्याशी बोलताना नम्रता पुर्वक शब्दाचा वापर करणे. याबाबतची स्पष्ट ताकीद देण्याची शिफारस करण्यात येत आहे. तसेच तद्नंतर सुधारणा न झाल्यास नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्याची शिफारस या चौकसी समितीने दिलेल्या चौकशी अहवालात स्पष्ट नमूद केले आहे.
वादग्रस्त शिक्षक उराडे यांच्यात सुधारणा झालीच नाही
वादग्रस्त ठरत असलेले शिक्षक नरेश उराडे यांनी आपल्या वागण्यात व असभ्य व उध्दट वागणूकीत थोडीसुद्धा सुधारणा केली नाही. उलटपक्षी अधिकच बेजबाबदार पणे व असभ्य व उध्दट वागणूकीत भर टाकून शिक्षकी पेशाला अशोभनीय अशा वागण्याने नागपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे वैभव असलेल्या शाळेच्या अधोगती स कारणीभूत ठरत असलेल्या या वादग्रस्त शिक्षकांवर आता तरी प्रशासकीय कारवाई अपेक्षित आहे.
शिक्षक नरेश उराडे हे पारशिवनी तालुका ग्राहक तक्रार निवारण मंचाचे आहे अध्यक्ष
शासकीय सेवेत कायम असलेले नरेश उराडे हे पारशिवनी तालुका ग्राहक संरक्षण मंचचे अध्यक्ष आहेत. ते अध्यक्ष असलेल्या तोरा मिरवत असतात व अध्यापनांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून असभ्य व उध्दट वागणूकीतून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पदाधिकारी, पालक यांच्याशी बोलतात त्यामुळे शैक्षणिक वातावरण भंग पावत असलेल्या ची तक्रार दिंनाक १/२/२०२३ ला गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांना लिखित स्वरूपात देण्यात आली. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई भोयर, काॅग्रेसचे पदाधिकारी डुमन चकोले, सामाजिक कार्यकर्ते गौरव पनवेलकर, रणजित ठाकूर, मोहन लोहकरे, विजय भुते, गोपाल कडू, दिपक भोयर, दिवाकर भोयर, व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष, पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वादग्रस्त शिक्षक नरेश उराडे यांच्यावर कठोर कारवाई करा. अन्यथा उपोषणाला बसणार
निवेदन देतेवेळी उपस्थितांनी गट विकास अधिकारी सुभाष जाधव यांना निवेदन दिले व तात्काळ वादग्रस्त शिक्षक नरेश उराडे यांच्यावर कठोर कारवाई करा अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा दिला.
गट विकास अधिकारी सुभाष जाधव यांनी तातडीने चौकशी करण्याचे दिले आदेश
सदासर्वकाळ वादग्रस्त ठरत असलेले शिक्षक नरेश उराडे यांना वारंवार समज देऊनही त्यांच्या वागण्यात सुधारणा होत नाही. हे त्यांचे विरोधात आलेल्या तक्रारीवरून स्पष्ट होत असल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी तातडीने चौकशी करण्यास अधिकारी व कर्मचारी यांना आदेश दिले व दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
पोलिसांनी सुध्दा स्विकारले निवेदन….
शाळा व्यवस्थापन समिती. पालकांनी पारशिवनी पोलिसांना निवेदन दिले व वादग्रस्त शिक्षक नरेश उराडे हे ग्राहक मंच चे अध्यक्ष असुन आम्हाला खोट्या गुण्यांत फसवणुकीच्या धमक्या देतात. अशा आशयाचे प्रत्र देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
जिल्हा परिषद सभागृहात प्रश्न मांडणार -अर्चना भोयर सदस्या जिल्हा परिषद.
वादग्रस्त ठरत असलेले शिक्षक नरेश उराडे यांच्या असभ्य व उध्दट वागणूकी बाबत शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या अनेक तक्रारी करूनही व स्वयंपाकी. मदतनिस महिलांना अपशब्दांचा वापर करून अपमानास्पद वागणूक देणार्या शिक्षकां विरूध्द चौकशी समितीने ठपका ठेवण्यात आला व सुधारणा न झाल्यास प्रशासकीय कारवाई करावी असे नमूद करूनही सुधारणा होत नाही. अश्या वादग्रस्त शिक्षक नरेश उराडे यांचा पाठीराखा कोण?
अशा प्रस्न जिल्हा परिषद सभेत आपण उपस्थित करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या अर्चना भोयर यांनी सांगितले.