मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
२२ गौवंश, एक ट्रक सह १७ लाख २० हजार रूपये चा मुद्देमाल जप्त करित ३ आरोपी अटक.
कन्हान (नागपुर) : – जबलपुरवरून नागपुरकडे ट्रक मध्ये बैल १८, गोरे ४ असे २२ गौवंश जनावरे कोंबुन कत्तली करिता नेताना खंडाळा (निलज) शिवारात स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पथक पोलीसानी पकडुन १७ लाख २० हजार रूपयेचा मुद्देमाल जप्त करित ३ आरोपीना अटक करित २२ गौवंश जनावरांना निमटोला गौशाला येथे पोहचुन गौवंशला जिवनदान दिले.
शुक्रवार (दि.२०) जानेवारीला स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पथक पोलीस पो.स्टे खापरखेडा अप क्रम.२१/२३ कलम ४५४, ३८० भादंवि च्या आरोपी शोध कामी पो.स्टे.कामठी, कन्हानचे हद्दीत फिरत असता गुप्त बातमीदार कडुन खबर मिळlली की, जबलपुरकडुन नागपुरला ट्रक क्र.एम एच ४० डीएल ८४९२ मध्ये काही ईसम अवैधरित्या कत्तल करीता गोवंश घेवुन जात आहे. अशा खबरेवरून खंडाळा (निलज) शिवारातील तारसा रोड ओव्हर ब्रीजवर पंच व स्टाफचे मदतीने नाकाबंदी केली असता सदर वाहन मिळुन आले. पंचा समक्ष पाहणी केली असता २२ गोवंश कोंबुन खाण्यापिण्याची सोय न करता बांधुन कत्तल करीता घेवुन जात असल्याचे दिसुन आल्याने त्यांच्या ताब्यातुन १८ बैल, ४ गोरे किंमत २ लाख २० हजार रुपये ट्रक क्र. एमएच ४० डीएल ८४९२ किंमत १५ लाख रुपये असा एकुण १७ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी १) इर्शाद खान इस्मा ईल खान वय ४० वर्ष, २) साहेब आलम मोहम्मद नासीर कुरेशी वय ३० वर्ष, ३) मिस्कत आलम मोहम्मद महमुद वय ३९ वर्ष सर्व राहणार कामठी या तिघाना अटक करून त्यांची मेडिकल तपासणी करून पुढील कार्यवाही करिता पो स्टे कन्हान यांचे ताब्यात देण्यात आले असुन यातील आरोपी ४) हाजी रेहान कुरेशी हाजी मोहम्मद कुरेशी राह. कामठी हा घटनास्थावरून पसार झाला. कन्हान पोस्टे ला त्यांचे विरुद्ध कलम ११(१) ड प्राण्यांना क्रुरतेने वागवण्याचा कायदा१९६० सहकलम ५, (१),(२),९, महा प्राणी सुरक्षा अधि नियम १९९५ सहकलम १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. व २२ गोवंश यांना निमटोला गौशाला येथे दाखल करून जिवनदान देण्यात आले.
ही कार्यवाही स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाचे पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचें मार्गदर्शनात स.पो. नि. अनिल राऊत, पो. हवा. विनोद काळे, पो. हवा. नाना राऊत, पो. हवा. ईकबाल शेख, ना.पो.का. मुकेश शुक्ला आदीने शिताफितीने यशस्विरित्या पार पाडली.