समस्त मतदार मंडळी, मतदान कुणालाही करा फक्त आवर्जून करा न चुकता करा. मुख्यत्वे एक काळजी घ्या. सरकार बनल्यावर जल्लोष आपल्या देशातच व्हायला हवा, शत्रू राष्ट्रात म्हणजे चीन पाकिस्थान सारख्या देशात नव्हे, तेवढी एक काळजी घ्या, कुठेही सहलीला निघून न जाता मतदानासाठी थांबा, अगदी रांगा लावून मतदान करा. 18 डिसेंबर 1970 रोजी मेरा नाम जोकर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता नेमका त्याच दिवशी म्हणजे 18 डिसेंबर 1970 यादिवशीच राहुल गांधी यांचाही जन्म झाला, हे राष्ट्र योग्य नेत्याच्या हाती सोपवू या. आता एक गम्मत सांगतो. अलीकडे धारावीत राहणाऱ्या एका आजीबाईकडे तिच्या मांजरीने तब्बल चार पिल्लांना जन्म दिला, विशेष म्हणजे चारही पिल्ले जन्म होताच चक्क ओरडायला लागली, काँग्रेसच येणार काँग्रेस जिंकणार !! बघता बघता हि बातमी अख्या धारावीत पसरली ज्याने त्याने म्हातारीकडे झेप घेतली आणि हि गम्मत बघितली. अर्थातच पुढल्या 10-12 दिवसात हि बातमी थेट हर्षाताई गायकवाड यांच्याही कानावर पोहोचली त्यादेखील आजीच्या झोपडीत पोहोचल्या, पण आजीने जेव्हा त्या पिल्लांना झोपडीबाहेर आणून हर्षाच्या हातात दिले, चारही पिल्ले एका आवाजात ओरडून म्हणाली, आयेगा तो मोदी…आयेगा तो मोदीही…हे ऐकून हर्षाताईंचा पारा चढला, हे कसे काय ? त्यावर आजीबाई हात जोडून म्हणाल्या, त्यादिवशी या पिल्लांचे डोळे उघडलेले नव्हते, अलीकडे ते नेमके उघडले आहेत…
मुंबई शेजारी असलेल्या ठाण्यात सरतेशेवटी महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार प्रताप सरनाईक घोषित करण्यात आले त्याचदिवशी ठाणे लोकसभा मतदार संघाचा निकाल जवळपास निश्चित झाला, उद्याचा निकाल आजच लागला, वेळेआधीच म्हणजे जणू सातव्या महिन्यातच बाळ जन्माला आल्यासारखा हा निकाल. आजतागायत जेव्हा केव्हा प्रताप सरनाईक मग ती त्यांची स्वतःची, पत्नी किंवा मुलांची नगरसेवक म्हणून निवडणूक असेल किंवा आमदारकीची, विशेष म्हणजे प्रत्येक वेळी जे घडते ते यावेळी नक्की घडणार नाही म्हणजे सरनाईक कुटुंबियांच्या निवडणुकीत मग ते दिवंगत वसंत डावखरे असतील किंवा जितेंद्र आव्हाड किंवा थेट त्यांच्या शिवसेनेतले एकनाथ शिंदे नरेश म्हस्के, एकजात सारेच्या सारेच अगदी उघड यासाठी सरनाईक कुटुंबीयांच्या विरोधात असतात कारण प्रताप म्हणजे कॉलेजातली सेक्सी आणि सुंदर तरुणी त्यात कायम पदर ढाळून वावरणारी त्यामुळे साऱ्यांची लाडकी, साहजिकच इतर स्पर्धेतल्या मुलींचा ती जळण्याचा जेलसीचा विषय, सरनाईक निवडून आलेत कि आपण मागल्या बेंचवर आणि सरनाईक थेट बड्या नेत्याच्या कडेवर, हे दृश्य त्यांच्या पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या नेत्यांना आजतागायत विचलित करीत आलेले, म्हणून त्यांना प्रत्येक निवडणुकीत प्रचंड आणि उघड विरोध करण्यात येतो तरीही सरनाईक कुटुंबाला निवडणूक मग ती कोणतीही असो पराभव जवळपास माहीतच नाही…
सुदैवाने यावेळची ठाणे लोकसभा निवडणूक याच सरनाईक यांचा पक्षांतर्गत ताकदवान शत्रू एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे लोकसभा जिंकून आणणे हे स्वतः प्रताप सरनाईक यांना जेवढे त्याचे महत्व नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने बालेकिल्ल्यातली हि लोकसभा जिंकणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वतःसाठी अत्यंत अत्यंत महत्वाचे त्यामुळे शिंदे यांना महाराष्ट्र एकीकडे त्यापेक्षा ठाणे जिंकणे त्या श्रीकांत शिंदे यांच्या निवडणुकीपेक्षा देखील कितीतरी अधिक पटींनी महत्वाचे कारण या लोकसभेला कायम सतत निवडून येणाऱ्या राजन विचारे यांना पराभूत करणे म्हणजे थेट उद्धव ठाकरे यांच्या थोबाडात बसण्यासारखे अन्यथा जर सरनाईक पराभूत झाले तर याच एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे तेही लोकांसमोर सतत कायम अनेकदा चिडवून डिवचून पाणउतारा करून करून जेरीस आणतील किंबहुना सरनाईकांचा पराभव त्यांच्या स्वतःच्या नेतृत्वापेक्षा थेट एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यातून त्यांना अनेक राजकीय अडचणींना नक्की तोंड द्यावेच लागेल.
म्हणून तर ठाण्यात यावेळी मोठी गम्मत आहे म्हणजे ज्या राजन विचारे यांच्या सोबतीने बलाढ्य नेता नंबर वन एकनाथ शिंदे साम दाम दंड आणि भेद हा साराच वापर करीत अगदी ठाम उभे राहून त्यांना हमखास निवडून आणायचे किंबहुना विरोधक आपला पराभव आधीच मान्य करून मोकळे व्हायचे, आज पारडे पूर्णतः फिरलेले आहे, आजतागायत सरनाईकांचे छुपे आणि उघड विरोधक त्यांच्या इकडे प्रचारासाठी एकत्र आलेले असतांना तिकडे राजन विचारे यांची अवस्था एखाद्या खोल विहिरीत एकटेच निपचित पडून आहेत अशी झालेली आहे, त्यांना प्रचारासाठी प्रसंगी एकट्याने फिरतांना बघितल्यास फारसे आश्चर्य वाटून घेता कामा नये. एखादा सिनेमा पहिल्याच शोला फ्लॉप होतो नेमके तेच राजन विचारे यांचे झाले आहे होणार आहे, त्यांचा पराभव आजच बघायला मिळणार आहे आणि तिकडे सरनाईकांना तसेही पराभवाची सवय नाही, आता तर त्यांची ताकद फार फार वाढलेली आहे, विशेष म्हणजे ज्या अजित पवार यांना याच सरनाईक यांनी एकेकाळी मौल्यवान असा सोन्याचा मोबाईल गिफ्ट केला होता ते दादा देखील आज सरनाईकांचे पाठीराखे आहेत, थोडक्यात सारेच दिग्गज त्यांच्या बाजूने आहेत मग ते गणेश नाईक असतील, एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा याच प्रताप यांचे एकेकाळचे महागुरू छगन भुजबळ किंवा थेट देवेंद्र फडणवीस…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी