पंतप्रधानांवर निराधार आरोप करणाऱ्यांनी सहा दशकात काय केलं ?

– आयएसी अध्यक्ष हेमंत पाटील यांचा राहुल गांधींना सवाल,६० वर्षातील कार्याचा लेखाजोखा सादर करण्याचे आवाहन

मुंबई – विश्वपटलावर भारताच्या खंबीर नेतृत्वाची ओळख निर्माण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कॉंग्रेसने केलेले वैयक्तिक आरोप दुदैवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात अनेक कामे केली असतांना देखील त्यांच्या नेतृत्वारच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या कॉग्रेस नेत्यांनी गेल्या सहा दशकात त्यांच्या सरकारांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा देशवासियांसमोर ठेवावा,असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केले.संसदेतच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतांना पंतप्रधानांनी कॉंग्रेसला त्यांची खरी जागा दाखवून दिल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

कॉंग्रेसने गेल्या ६० वर्षांच्या काळात जी कामे केली नाहीत ती केवळ आठ वर्षांमध्ये मोदींनी करून दाखवली. पंतप्रधानांनी कधीही स्वत:चा आणि पक्षाचा स्वार्थ बघितला नाही. निस्वार्थ मनाने ते देशाची सेवा करीत आहेत.देशासाठी त्यांनी केलेल्या त्यागाची तुलना करता येणार नाही. देशासाठी कॉंग्रेसचा त्याग देखील दुर्लक्षित करण्यासारखा नाही.पंरतु, विद्यमान पक्षीय नेतृत्वामुळे पक्ष रसातळाला गेला आहे. कॉंग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भांत आता ‘श्वेतपत्रिता’ काढण्याची गरज आहे, असे आवाहन पाटील यांनी केले.

देशाचा सार्वत्रित विकासासाठी उद्योजकांसोबत राजकीय नेतृत्वाचा संबंध असणे वाईट नाही.पंरतु, याचा गैरफायदा घेत थेट हिंडनबर्ग रिसर्च ने अडाणी संदर्भात केलेल्या आरोपांमध्ये थेट पंतप्रधानांना खेचणे योग्य नाही. विरोधकांनी संसदेच्या सर्वोच्च सभागृहात ‘मोदी-अडाणी भाई भाई’च्या घोषणा देत, पंतप्रधानांच्या भाषणात व्यत्यय आणत देशाचा अपमान केला आहे. विरोधकांनी त्यामुळे देशाची माफी मागावी, असे आवाहन पाटील यांनी केले.कॉंग्रेसच्या काळात स्थानिक महामंडळाच्या नियुक्या पैसे देवून केल्या जायच्या.भाजपच्या काळात ते बंद झाले आहे. भाजपच्या याच स्वच्छ आणि निस्वार्थ, पारदर्शक कारभारामुळे २०२४ मध्ये देखील मोदीच पंतप्रधान होतील,असा दावा पाटील यांनी केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन

Sat Feb 11 , 2023
नागपूर : विदर्भातील युवक आणि युवतींसाठी कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच फॉर्च्युन फाउंडेशन व जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिका नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात दिनांक 17, 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन आमदार निवास, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यात जवळपास शंभराहून अधिक उद्योजकांनी सहभाग घेतला असून त्यांच्याकडे उपलब्ध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com