पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धा, दुसऱ्या दिवशी विविध विद्यापीठ संघांची जोरदार झुंज

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धेच्या दुस­या दिवशीच्या सकाळच्या सत्रात विविध विद्यापीठांच्या संघांमध्ये जोरदार लढती झाल्यात. काही विद्यापीठ संघांनी एक-दोन गुणांनी, तर काही संघांनी मोठंया फरकाने विजय मिळविला. त्यामध्ये देवी अहिल्यादेवी विद्यापीठ, इंदौर विरुध्द गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्यात सामना झाला. यामध्ये देवी अहिल्यादेवी विद्यापीठ संघाने गोंडवाना विद्यापीठ संघावर 2 गुणांनी विजय मिळविला. जिवाजी विद्यापीठ, ग्वाल्हेर विरुध्द लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिटूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, ग्वाल्हेर यांच्यात रंगलेल्या सामन्यात लक्ष्मीबाई विद्यापीठ संघाने जिवाजी विद्यापीठ संघावर 1 गुणांनी विजय मिळविला. छिंदवाडा विद्यापीठ, छिंदवाडा विरुध्द गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद यांच्यात जोरदार लढत झाली. यामध्ये गुजरात विद्यापीठ संघाने छिंदवाडा विद्यापीठ संघावर 12 गुणांनी विजय मिळविला. भक्त कवी नर्सिंग विद्यापीठ, जुनागढ विरुध्द चारुतर विद्या मंडल विद्यापीठ, गुजरात यांच्यात झालेल्या सामन्यात चारुतर विद्यापीठ संघाने भक्त कवी नर्सिंग विद्यापीठ संघाचा 2 गुणांनी पराजय केला. महाराज गणसिंग विद्यापीठ, बिकानेर विरुध्द महर्षि दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर यांच्यात चुरशीचा सामना झाला. यामध्ये महर्षि विद्यापीठ संघाने महाराज गणसिंग विद्यापीठ संघाचा 31 गुणांनी पराभव केला.

हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात विद्यापीठ, पाटण विरुध्द के.बी.चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यात झालेल्या सामन्यात हेमचंद्राचार्य विद्यापीठ संघाने के.बी. चौधरी विद्यापीठ संघावर 6 गुणांनी विजय मिळविला. महाराज छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठ, छत्तरपूर विरुध्द महाराज सुरजमल विद्यापीठ, भरतपूर यांच्यात झालेल्या सामन्यात महाराज छत्रसाल विद्यापीठ संघाने महाराज सुरजमल विद्यापीठ संघावर 31 गुणांनी विजय मिळविला. इंदिरा गांधी नॅशनल ट्रायबल युनिव्हर्सिटी, अमरकंटक विरुध्द कडी सौरव विद्यापीठ, गांधीनगर (गुजरात) यांच्यात रंगलेल्या सामन्यात इंदिरा गांधी विद्यापीठ संघाने कडी सौरव विद्यापीठ संघाचा 37 गुणांनी पराभव केला. पारूल विद्यापीठ, वडोदरा (गुजरात) विरुध्द शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यात झालेल्या सामन्यात शिवाजी विद्यापीठ संघाने पारुल विद्यापीठ संघाचा 37 गुणांनी पराभव केला. राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ, गांधीनगर (गुजरात) विरुध्द श्री गोविंद गुरू विद्यापीठ, गोध्रा यांच्यात झालेल्या सामन्यात रक्षा विद्यापीठ संघाने श्री गोविंद गुरू विद्यापीठ संघावर 23 गुणांनी मात केली. कोटा विद्यापीठ, कोटा विरुध्द विक्रम विद्यापीठ, उजैन यांच्यात रंगलेल्या सामन्यात कोटा विद्यापीठ संघाचा 14 गुणांनी पराभव झाला. राजस्थान विद्यापीठ, जयपूर विरुध्द राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूर यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थान विद्यापीठ संघाने राणी दुर्गावती विद्यापीठ संघाचा 15 गुणांनी पराभव केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री ने भारत के मुख्य न्यायाधीश के रूप में शपथ लेने पर डॉ. न्यायमूर्ति डी वाई चंद्रचूड़ को बधाई दी

Thu Nov 10 , 2022
दिल्ली :- प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी ने भारत के मुख्य न्यायाधीश के रूप में शपथ लेने पर डॉ. न्यायमूर्ति डी वाई चंद्रचूड़ को बधाई दी है। अपने ट्वीट में प्रधानमंत्री ने कहा : “डॉ. न्यायमूर्ति डी वाई चंद्रचूड़ को भारत के मुख्य न्यायाधीश के रूप में शपथ लेने पर बधाई। उनके आगे के सफल कार्यकाल की कामना।” Follow us on Social […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!