अन …आज अहवाल आलाच नाही ..

कोदामेंढी :- येथील सरपंच आशिष बावनकुळे यांनी 3,88, 474 पथदीप घोटाळा केला आहे. याबाबत मागील पंधरा दिवसांपूर्वी पासून विविध मराठी व हिंदी दैनिकांमध्ये दररोज वृत्त प्रकाशित होत आहेत. 22 ऑक्टोबर मंगळवार ला अरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्नेहल राऊत व कॉन्स्टेबल राजेंद्र पूडके यांनी चौकशी करून सरपंच, सचिव व दुकानदारावर गुन्हे दाखल करण्यासाठी ऑनलाईन तक्रार करणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्या घरी येऊन बयान त्यांची स्वाक्षरी घेऊन नेलेले आहे.

शनिवार 19 ऑक्टोबरला गट विकास अधिकारी मौदा यांना भ्रमणध्वनीवरून विचारपूस केली असता ,त्यांनी ग्रामपंचायत कोदामेंढीचे सचिव एस. एन. पाटील यांना पत्र देऊन पथदीप घोटाळ्याच्या अहवाल सात दिवसाच्या आत अहवाल म्हणजेच 25 ऑक्टोबर शुक्रवार पर्यंत अहवाल मागितला होता व तो अहवाल गट विकास अधिकारी मौदा ऑनलाइन तक्रार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मेल आयडीवर पाठविणार होते. मात्र आज शुक्रवारी 25 ऑक्टोबरला रात्री साडेआठ पर्यंत ई-मेल आयडीवर अहवाल न आल्याने गट विकास अधिकारी यांना विचारपूस करण्यासाठी साडे रात्री साडेआठ वाजता भ्रमणध्वनी केले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्या अहवालाकडे मौदा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. बातमी लिहेपर्यंत अहवाल आलेला नव्हता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मेरा भारत, मेरी दिवाली

Sat Oct 26 , 2024
– टिम कैट नागपुर का २७ तारीख को इतवारी शहीद चौक से बाजार स्वच्छता अभियान। विदर्भ चण्डी मंदिर में भी कार्यक्रम नागपूर :- भारत सरकार के युवा एवं खेल मंत्रालय की पहल पर कैट 27 से 30 अक्टूबर 2024 तक देश भर में ‘मेरा भारत-मेरी दिवाली’ राष्ट्रीय अभियान में बढ़ चढ़ कर सहयोग करने कह रहा है। इस अभियान के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!