यवतमाळ :- 16 मे 2024 रोजी सकाळी वृत्तपत्र विक्रेता संस्थेद्वारे गोळा केलेला कल्याण निधी ज्या सदस्यांना मोठे आजार किंवा अपघात होतात मोठी शस्त्रक्रिया होतात त्यांना मदत म्हणून 2100 रुपये निधी दिला जातो. हा निधी राजू हनवते, अर्जुन राठोड, ज्ञानेश्वर वाघ, सुनील बोरकर या सदस्यांना मदत म्हणून प्रदान करण्यात आला तर महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटने द्वारा अपघाती मृत्यू दुर्धर आजाराने मृत्यू अशा सदस्यांना मृत्यू पावल्यास मृत्यू पश्चात त्यांच्या परिवारास पाच हजार रुपये निधी दिला जातो. तो स्वर्गीय अनिल गोपेवार व बाळू शिंदे यांच्या परिवारास देण्यात आला तसेच महाराष्ट्र संघटने द्वारा तयार केलेले ओळखपत्र चे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास दैनिक भास्करचे यवतमाळ वितरण प्रतिनिधी आसिफ शेख अशोक शिंदे महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष शिरभाते ज्येष्ठ सदस्य कस्तुरचंदसेठीया, श्रीपाद तोटे मदन केळापुरे यांच्या हस्ते देण्यात आले. कल्याण निधीची माहिती व ओळखपत्राची माहिती सचिव किरण कोरडे यांनी सदस्यांना अवगत करून दिली कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राजू भलावी सचिन कदम तुषार गुजलवार प्रवीण आगलावे, श्रीराम खात्री, किशोर भेदरकर, रवींद्र चव्हाण व सर्व सदस्य गणांनी परिश्रम घेतले.