संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-आता देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करावे :- अँड. सुलेखाताई कुंभारे
कामठी ता प्र 2 :-महाराष्ट्र सरकार मध्ये राष्ट्रवादीचे अजीत पवार, छगन भुजबळ, संजय बंसोड, सारख्या राष्ट्रवादी नेत्यांचा समाविष्ट करण्यात आला. या राष्ट्रवादी नेत्यांना युती सरकार मध्ये समाविष्ट करून घेण्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची फार मोठी भुमीका आहे.
या पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह 40 आमदार व 13 खासदारांना सरकार मध्ये समाविष्ट करून घेण्यामध्ये सुध्दा देवेंद्र फडणविस यांची प्रमुख भुमीका होती.
भारतिय जनता पक्षाचे 106 आमदार असतांना सुध्दा, पक्षाच्या आदेशाचे पालन करीत देवेंद्र फडणविस यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. आता ख-या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला अभ्यासु, सर्व समाज घटकांना सोबत घेवून चालणारा तसेच महाराष्ट्राच्या विकासाची कास धरणा-या देवेंद्र फडणविस सारख्या व्यक्तीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करावे अशी अपेक्षा आहे, असे मत माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केले.