बुधवारी जिल्ह्यात 56 कोरोना पॉझिटिव्ह तर 35 रुग्णांना डिस्चार्ज

एकूण डिस्चार्ज59031

एकूण पॉझिटिव्ह60440

क्रियाशील रुग्ण275

आज मृत्यू शून्य

एकूण मृत्यू1134

रिकव्हरी रेट97.67 टक्के

मृत्यू दर01.88

आजच्या टेस्ट1281

  • एकूण टेस्ट494504

भंडारा, दि. 12 :  जिल्ह्यात बुधवारी 56 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.12) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 35 आहे. बुधवारी 1281 व्यक्तींची चाचणी केली असता 56 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 275 सक्रिय रुग्ण आहे.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 59031 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60440 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 94 हजार 504 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60440 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 29, मोहाडी 01, तुमसर 11, पवनी 00, लाखनी 08, साकोली 03 व लाखांदुर तालुक्यातील 04 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1134 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

  • कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असून पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस अवश्य घ्यावी.
  • जे लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी पात्र ठरले आहेत, त्यांनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा.
  • कोविड वर्तणूक नियमावलीचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

लिंगा में नि:शुल्क स्वास्थ्य शिविर, कोविड टीकाकरण एवं रक्तदान शिविर

Wed Jan 12 , 2022
काटोल संवाददाता – सामाजिक सेवा संगठन वीरा फाउंडेशन काटोल ने काटोल तालुका के लिंगा गाव में मुफ्त स्वास्थ्य जांच शिविर के साथ-साथ कोविड टीकाकरण और रक्तदान शिविर का आयोजन किया। शिविर मे आसपास के गांवों के 500 से अधिक रोगियों को लाभान्वित किया और 300 से अधिक रोगियों को मुफ्त चश्मे वितरित किए।       शिविर का आयोजन लिंगा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com