सामाजिक बांधिलकी व मानवता धर्म जपत दिव्यांगांच्या पाठीशी आपण सर्व उभे राहू – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत ध्येयपूर्ती राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण

मुंबई :- नूतन गुळगुळे या सेवाभावी संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग मुलांना आधार देण्याचे महत्वाचे काम केले आहे. हीच सामाजिक बांधिलकी व मानवता धर्म जपत आपण सर्व नागरिक दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहू, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.   रविंद्र नाट्यमंदीर, प्रभादेवी येथे आयोजित सातव्या ‘ध्येयपूर्ती पुरस्कार’ कार्यक्रमांतर्गत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात अपूर्व आणि अतुलनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. या सोहळ्यास ‘नानावटी मॅक्स हॉस्पिटल’चे ज्येष्ठ कर्करोग सर्जन डॉ.संजय दुधाट, एसबीआय जनरल इन्शुरन्सचे उप-व्यवस्थापकीय संचालक आनंद पेजावर, कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या संचालक आम्रपाली साळवे व नूतन गुळगुळे फाऊंडेशनच्या अध्यक्षा नूतन गुळगुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, समाजात अशा अनेक सेवाभावी संस्था समाजसेवचे काम करीत आहेत. त्या संस्थांना प्रेरणा देण्याचे काम नूतन गुळगुळे फाउंडेशन करीत आहे. आज कर्तृत्ववान दिव्यांगांच्या कार्याचा या संस्थेने गौरव केला ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी मी या संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. शासनाच्या वतीने दिव्यांगांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले..

या सोहळ्यात एसबीआय जनरल तर्फे 30 लाख रूपयांचा तसेच कोचीन शिपयार्ड लिमिटेड तर्फे 50 लाख रूपयांचा धनादेश सीएसआर निधीतून नूतन फाउंडेशन संस्थेला देण्यात आला.

या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १५ दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor presents Lifetime Achievement Award to Ms Amena Latif, Maharashtra Special Teacher

Sun Nov 6 , 2022
Governor presents 7th National Level Dheypurti Puraskar Mumbai :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the ‘Dheyapurti National Award 2022’ organized by Nutan Gulgule Foundation to various dignitaries. The Governor presented the Life Time Achievement Award to Amena Latif, Maharashtra Special Teacher. Differently abled persons, special children including cancer survivors, various organizations and families were felicitated. Dr. Sanjay Dudhat, Senior […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!