मृद व जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी काढणार पाणलोट यात्रा – मंत्री संजय राठोड यांची माहिती

यवतमाळ :- माती आणि पाणी या दोन महत्वाच्या घटकांशी निगडीत असलेल्या मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी नवीन वर्षात ‘पाणलोट रथयात्रा’ काढण्यात येणार आहे. ही यात्रा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात संपूर्ण राज्यात फिरणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. ते आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शेती, सिंचन या दृष्टीने मृद व जलसंधारण विभागत अत्यंत महत्वाचा आहे. राज्यात असलेले छोटे तलाव व पूर्व विदर्भातील मामा तलाव या विभागाच्या मालकीचे आहेत. या तलावांतील गाळ उपसा, खोलीकरण करून त्याची सिंचन क्षमता वाढविण्यात येणार आहे. पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत नाला सरळीकरण, खोलीकरण, कालवा, पाटसऱ्या दुरूस्ती करण्यात येणार आहे. नव्याने कालवे निर्मिती पाईप टाकून करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही व शेवटच्या टोकापर्यंत पाणी पाहोचविण्याचा आमच्या विभागाचा प्रयत्न राहिल, असे ना. संजय राठोड यांनी सांगितले. मृद व जलसंधारण विभाग पाणलोट क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था, व्यक्तींची मदत घेवून विकासात्मक उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह पाणी, नाम फाऊंडेशन, अण्णा हजारे, पोपटराव पवार आदींचे सहकार्य मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा विकास कार्यक्रम जाहीर केला आहे. मृद व जलसंधारण विभागही १०० दिवसांत राज्यात अनेक उपक्रम व योजना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची सुरूवात मंगळवारी मंत्रालयात राज्यातील विविध संस्थाची बैठक घेवून त्यांच्याकडून सूचना मागवून करण्यात आली. त्यामुळे मृद व जलसंधारण विभागही लवकरच इतर विभागांप्रमाणे वैशिष्टपूर्ण कामांसाठी ओळखला जाईल, असे ते म्हणाले. राज्यात लवकरच जलयुक्त शिवार टप्पा दोन सुरू करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना जवळच्या धरण व तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंवर्धनाच्या जगजागृतीसाठी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध आदी स्पर्धांचे आयोजनही केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने ५० च्या वर क्षेत्रात विकासकामे करता येतात. आदर्श गाव, बचत गट, सिंचन विकास, पडीक जमीन विकास अशा अनेक क्षेत्रात काम करून या विभागाला नावलौकीक मिळवून देवू, असे यावेळी मंत्री संजय राठोड यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, पराग पिंगळे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्ह्यातील विविध विभागांची रिक्त पदे प्राधान्याने भरणार - मंत्री संजय राठोड

Thu Dec 26 , 2024
Ø मृद व जलसंधारण मंत्र्यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा Ø जलसंधारण विभागाची अजून 3 हजार पदे भरणार Ø मृद व जलसंधारणच्या भरीव कामासाठी पाणलोट यात्रा यवतमाळ :- जिल्ह्यात महसूलसह विविध विभागाची अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे कामे करतांना अडचणी निर्माण होता. येत्या काही दिवसात रिक्त पदांचा आढावा घेऊन माहिती द्या. ही रिक्त पदे भरण्याला आपले प्राधान्य राहणार असून त्यासाठी मंत्रालयात प्रत्येक विभागाकडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!