जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांची चंद्रपूर मनपात सदिच्छा भेट

चंद्रपूर : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी (दि. ९) सायंकाळी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या प्रमुख प्रशासकीय इमारतीत सदिच्छा भेट दिली. यावेळी मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी त्यांचे स्वागत केले.

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील ९ डिसेंबर रोजी चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. दिवसभर खासगी आणि पक्षीय कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी मंत्रीमहोदयांनी शहरातील विविध समस्या जाणून घेतल्या. मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने राबविलेल्या विविध विकास कामांची माहिती मंत्रिमहोदयांना दिली. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.

दिनेश दमाहे

9370868686

dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत व इतर अधिकारी यांना आप कडून श्रद्धांजली

Thu Dec 9 , 2021
नागपूर – भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचे बुधवारी तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या अपघातात त्यांच्या पत्नीसह आणखी 12 जणांना जीव गमवावा लागला. या हाद्स्यामुळे भारतीय सेनेची व देशाची फार मोठी न भरून निघणारी हानी झाली आहे. आज व्हेरायटी चौक येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर आम आदमी पार्टी कडून शहीद झालेले जनरल बिपीन रावत, त्यांच्या धर्मपत्नी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!