अमरदिप बडगे, प्रतिनिधी
आमगाव येथील ऐसार पेट्रोल पंप वरील प्रकार
पेट्रोल मशीन मधुन पेट्रोल ऐवजी पाणी;अनेक ग्राहकाना झाला नाहक भुर्दंड
गोंदिया – जिल्ह्यातील आमगाव येथील रिया फ्युल स्टेशन या नावाने असलेल्या ऐसार कंपनीच्या पेट्रोल पंपावर सायंकाळ च्या सुमारास वाहन ग्राहकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरून वाहन चालविले परंतु अनेक वाहने काही अंतरावर गेल्यावर पडत असल्याची तक्रारी पुढे आली. यात वाहन चालकांनी वाहने मैकेनिक कडे तपासल्यावर टॅंक मध्ये पेट्रोल नसून पाणी असल्याचे पुढे आले, यावर वाहन धारकांनी पेट्रोल पंप वर धाव घेऊन तपासले असता पेट्रोल ऐवजी चक्क पाणीच विक्री होत. असल्याची निदर्शनात आले, तर अनेक वाहनधारकांनी पेट्रोल हे बाटलीत घेतले व पाहणी केली. तर काय पेट्रोलच्या ऐवजी सरळ पाणीच विक्री होत, असल्याचे पुढे दिसून आले. यावेळी अनेकानी पेट्रोल भरलेल्या वाहन ग्राहकांची तक्रारी व गर्दी वाढत गेली. यावेळी तक्रार करून ही पाणीची विक्री सुरूच होती.
शेवटी तहसीलदार आमगाव व ऐसार कंपनीच्या टोलफ़्री क्रमांकावर ग्राहकांनी तक्रार करताच तहसील अधिकारी यांनी पंचनामा करून पंप बंद केले. परंतु पंप चालकाने सायंकाळ ४ वाजे पासून 6 वाजेपर्यंत मात्र पेट्रोल ऐवजी पाण्याची विक्री करून मात्र वाहनधारकांची लूट केली. आता कंपनी व प्रशासन या पंपचालकांवर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल..