वॉर्सा – मुंबई थेट विमानसेवेमुळे व्यापार, पर्यटनाला चालना मिळेल : पोलंड राजदूत

 मुंबई : पोलंड गणराज्याचे भारतातील राजदूत प्रो. ऍडम बुराकोवस्की यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

            दिनांक ३१ मे रोजी पोलंडची राजधानी वॉर्सा येथून मुंबई पर्यंत थेट विमानसेवा सुरु झाल्यामुळे भारत व पोलंड देशांमधील व्यापार व पर्यटनाला चालना मिळेल, असे राजदूत बुराकोवस्की यांनी यावेळी राज्यपालांना सांगितले. पोलिश एअरलाईन्सची ही विमानसेवा आठवड्यातून तीनदा असेल असे त्यांनी सांगितले.

            पोलंड – भारत राजनैतिक संबंध १९५४ साली सुरु झाले असले तरी मुंबई येथील दूतावास सन १९३३ पासून सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोलंडमध्ये ४०,००० भारतीय राहत असून ते विविध क्षेत्रात चांगले योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

            शिक्षण क्षेत्रात देखील पोलंड भारताशी सहकार्य करण्यास इच्छूक असून आजच मुंबई विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंची भेट घेतल्याचे राजदूतांनी सांगितले.

महाराष्ट्राशी जुने संबंध

            पोलंड येथून काही निर्वासित दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूर येथे आले होते त्यामुळे पोलंडचे महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. पोलंड सरकारच्या वतीने कोल्हापूर येथे एक स्मारक तयार करणार असून या संदर्भात संभाजी छत्रपती यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.  भारतातील काही चित्रपट पोलंड येथे चित्रित झाल्याचे त्यांनी सांगितले.

            बैठकीला पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन इरझिक हे देखील उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बीड जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणार; पाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार -पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Thu Jun 2 , 2022
मुंबई : बीड जिल्ह्यातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील 1 हजार 367 गावातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे पाणी देण्याचे शासनाचे नियोजन आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने काटेकोर, विनाविलंब नियोजन करावे, जिल्ह्यात पाणी पुरवठा योजना नसलेल्या 101 गावांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. बीड जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार असून यासाठी आवश्यक निधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!