आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमुळे नाव शोधणे आणि हरकती दाखल करण्याची सुविधा

मुंबईदि. 28 : राज्यातील विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.  

          आयुक्त मदान यांनी सांगितलेबृहन्मुंबईठाणेनवी मुंबईकल्याण- डोंबिवलीउल्हासनगरवसई- विरारपुणेपिंपरी- चिंचवडसोलापूरकोल्हापूरनाशिकअकोलाअमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

          प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिकेत किंवा त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यात आपले नाव तपासता येईल. ती सुविधा आता ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यासहरकत दाखल करता येते. या हरकतींचा लवकर निपटारा होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने एक नमुना अर्ज तयार केला आहे. त्याद्वारे आपण हरकत घेऊ शकतो आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारेही सोप्या पद्धतीने हरकत दाखल करता यतेअसेही  मदान यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भर पाऊसात अग्निपथ विरोधात काँग्रेस चे धरणे आंदोलन

Tue Jun 28 , 2022
अमरदिप बडगे गोंदिया – केंद्रातील भाजप सरकारचे नव्याने काढलेल्या अग्निपथ योजने अंतर्गत भरती करण्यात येणार याच्या विरोधात काँग्रेस च्या वतीने तिरोडा येथे भर पावसात शेकडो काँग्रेस कार्यकत्यांनी धरणे आंदोलन करत अग्निपथ योजना भरती रद्द करावे आणि ज्या प्रमाणे सैनिक भरती होत आहे. त्याच प्रमाणे भरती करण्यात यावी अशी मागणी करत उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रपतींच्या नावाचे निवेदन देण्यात आले..   हि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com