– पोलिस निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
नागपूर :- कुठलाही गुन्हा नसताना तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या फिर्यादिलाच पोलीस निरीक्षक यांनी बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. या घटनेमुळे पोलीसांच्या वर्तवणूकीवरच आता गालबोट लागले आहे. नागपूर शहरातील वाडी पोलीस स्टेशनची हि घटना असून असे गैरकृत्य करणाऱ्या पोलीस निरीक्षकाचे नाव विनोद गोडबोले आहे. ते वाडी पोलीस स्टेशनचे दुय्यम पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. शनिवार ३ फेब्रुवारी रोजी पीडित प्रमोद केशवराव खोब्रागडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना आपबिती सांगितली.
पीडित प्रमोद खोब्रागडे यांच्या वडिलांचे दहा वर्षांपूर्वीचे विदर्भ प्रीमियर सोसायटी धरमपेठ शाखा नागपूर येथील गृह कर्ज त्यांनी नियमित परतफेड करून वर्ष 2022 ला कर्ज खाते बंद केले. त्याकरिता त्यांना सोसायटीकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावयाचे होते. मात्र सोसायटीमधून मालमत्तेचे मूळ कागदपत्र गाळ झाल्याचे माहिती सोसायटीचे व्यवस्थापकाद्वारे त्यांना देण्यात आली.
याबाबतीत आक्षेप घेण्यात आल्यावर व्यवस्थापकांनी त्यांना सत्य प्रतिलिपीचे चार फोटोकॉपी काढून देतो मात्र तुम्ही चुपचाप रहा अशी धमकी दिली. संबंधित तक्रारदाराच्या वडिलांनी फोटोकॉपी घेण्यास नकार दिला असता बँकेतील कर्मचारी तक्रारकर त्याच्या घरी जाऊन त्यांना धमकावू लागले आणि सोसायटीची तक्रार कुठेही केल्यास तक्रार करता तसेच त्यांचे वडील यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असे तक्रारीत नमूद आहे.
या संदर्भात चौकशी करण्यासाठी ते गेले असता प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी सकाळी ९ ते १० या दरम्यान वाडी पोलीस स्टेशनमध्ये मी मॉनिंग वॉक च्यावेळी बर्मुडा आणि टी-शर्ट मध्येच गेलो असता दुय्यम निरिक्षक विनोद गोडबोले या पोलीसांनी थोबाडात मारून चार तास तुरुंगात ठेवण्यात आले असा आरोप करून पत्रपरिषदेत पीडित प्रमोद खोब्रागडे यांनी पत्रकारांना आपबिती सांगितली. दुय्यम निरीक्षक विनोद गोडबोले यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी यांनी मागणी केली.