नागपूर :- मी सातत्याने लोकांमध्ये वावरत असल्याने सर्व नागरिकांच्या समस्यांची मला जाणीव आहे. या समस्या सोडविण्यासाठी मी 24 तास नागरिकांसाठी उपलब्ध होतो आणि पुढील काळातही परिवारातील सदस्य म्हणून सोबत राहणार.आणि मतदारांचा माझ्यावरचा विश्वास कायम जपत राहील.असे प्रतिपादन महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार प्रवीण दटके यांनी केले, दटके यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.जागोजागी त्यांचे स्वागत करत त्यांच्या विजयाचा विश्वास नागरिक देत आहेत. आज जन संवाद यात्रा भारत माता चौक येथून प्रारंभ होऊन पांचपावलेश्वर मंदिर पिवळी मारबत चौक व आखाडा मोहल्ला , पोलीस चौकी, आमले मोहल्ला दुर्गेश सावजी गल्ली , मच्छीसाथ हेडाऊ मोहल्ला, कोलबास्वामी मठ, भीसीकर मोहल्ला, माता मंदिर, तीन नल चौक, खातिकपुरा, मच्छीसाथ पुरा, शेख हुसेन यांची गल्ली पाठरावे मोहल्ला, ढेमसे मोहल्ला बांगरे मोहल्ला, जैन मंदिर नेहरू पुतळा, समर्थ ऑफीस चुना ओळ गणपती जंगल्याची धोंडबाजी यांचे दुकान, गुप्ता ओळ, कमलकिशोरचा ढाबा , महाराणा प्रताप चौक बौध्दपुरा चौक, बोरकरचा वाडा – भोलेशाह दरगाह ,कल्पक भाऊ यांचे घर पिवळी मारबत चौक प्रकाश गौरकर घोटकर गल्ली वसंत पौनीकर सूरज गोजे यांच्या कार्यालयाजवळ समाप्त झाली. यावेळी आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे,भाजप मध्य नागपूर अध्यक्ष श्रीकांत आगलावे, गिरीश देशमुख,बंडू राऊत,दिपराज पार्डीकर सुरज गोजे,भास्कर पराते, रितेश पांडे, सागर पांडे, गोपाल धुले,संजय महाजन, तुषार लारोकर, हेमंत बरडे, बादल राऊत, संदीप तामने,महेश सबळ, राहुल हरडे, श्रेयश कुंभरे, रोहित सहारे, सौरभ मार्कंडे, सागर मुंदेकर, शरद मुंदेकर, सचिन लारोकर, अरविंद पाठारे, सुधीर यादव, विशाल ढोमणे, सचिन राठोड, वामन राऊत, जयकांत शर्मा, राहुल अल्लारवार, प्रमोद मोहपेकर, कल्पक भंडारकर, कमलेश समर्थ, मयुरेश दळवे, दीपक बांदेकर, राहुल वाटकर, आयुष राऊत, सिद्धार्थ महाजन, अमित गुप्ता, सोनू पटेल, अब्दुल कदीर, मधुर गडीकर, वीरेंद्र वेलेकर, बंडू बागडे, भाजपा पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.