9 नोव्हेंबर पासून मतदार नोंदणी 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-आता वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी

कामठी :- आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी हा अहर्ता दिनांक असायचा.म्हणजे 1 जानेवारी किंवा त्याआधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र 2023 पासून जानेवारी, एप्रिल ,जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील त्यांना 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या विशेष मोहिमे अंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.

निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरणं अत्यंत महत्वपूर्ण असते.9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 हा कालावधी मतदार नोंदणीचा आहे.एखाद्याच्या नावासंबंधी हरकती घेण्याचाही आहे.एखाद्या मतदार संघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल तर अशा नावाबद्दल त्याच मतदार संघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो त्यामध्ये जर तथ्य आढळुन आले तर पडताळणी करून संबंधित मतदारांची वगळनीही महत्वाची असते. यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने 19 व 20 नोव्हेंबर आणि 3 व 4 डिसेंबर या दिवशी विशेष शीबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच वंचित घटकासाठी खास शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. महिला आणि दिव्यांग यांच्या नाव नोंदणीसाठी 12 व 13 नोव्हेंबर रोजी तर 26 व 27 नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी विशेष शिबिरे घेतली जातील.

11 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे या दिवशी ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन केले जाणार आहे. त्याअंतर्गत नव्याने नाव नोंदनिस पात्र नागरिक, विवाहानंतर गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक याची नाव नोंदणी केली जाईल तसेच दुबार नावे,मृत व्यक्ती ,गावातुन कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावाची मतदार यादीतून वगळणी केली जाईल. मतदार नोंदणीसाठी पात्र युवानी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे तसेच प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घ्यावे असे आवाहन कामठी तहसीलच्या निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कचरा टाकणाऱ्या जागेवर केले जात आहे योगनृत्य

Mon Nov 7 , 2022
राजीव गांधी उद्यान पठाणपुरा योग नृत्य परिवारातर्फे स्वच्छतेचा संदेश चंद्रपूर :- पठाणपुरा दरवाजाबाहेरील कचरा टाकल्या जाणाऱ्या जागेचे रूपांतर स्वच्छ परिसरात झाले असुन आता त्या जागेवर योगनृत्य परिवारातर्फे रोज सकाळी नृत्याद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा ” आयोजित केली गेली असुन स्पर्धेअंतर्गत, माजी नगरसेवक नंदू नागरकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com