– संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
मुंबई :- ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2023 व उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार 2023 चा वितरण समारंभ मुंबईत सोमवारी (ता. 26) राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले आहे. राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडिया, शेठ ब्रिज मोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेठ ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशीष लढ्ढा राहणार असून या कार्यक्रमाला युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, परभणीचे आमदार राहुल पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक सम्राट फडणीस, विचारवंत नामदेव भोसले व आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्राचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांची उपस्थिती राहणार आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर, मंत्रालयासमोर सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. व्हॉईस ऑफ मीडियाच्या व प्रदेश, विभाग, जिल्हा, तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांनी केले आहे.