नागपूर :- नागपूरच्या विकासातील आदर्श मापदंड ठरलेल्या महामेट्रो भवन, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट व मिहान प्रकल्पाला राज्य अधिस्विकृती समितीच्या सर्व सदस्यांनी आज भेट देऊन पाहणी केली. समितीच्या दोन दिवसीय बैठकीसाठी सर्व सदस्य नागपूर येथे आले होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुरदृष्टीतून नागपूर येथे विविध महत्वाकांक्षी प्रकल्प साकारले गेले आहेत. त्यानुसार जागतिक पातळीवरील गुणवत्तेच्या शैक्षणिक सुविधा, आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय हब,दळणवळणासाठी महामार्गासह मेट्रोची सुविधा, कॅन्सरसारख्या आजारावर सर्वसामान्य रुग्णांसाठी उपचार करता यावे यासाठी अत्याधुनिक कर्करोग संस्था अशा सुविधांमुळे नागपूर जगाच्या नकाशावर आले आहे.
मेट्रो भवन भेटीदरम्यान सदस्यांनी संतुष्टी, सर्क्युलर गॅलरी, ऑपरेशन कंट्रोल सेंटर अश्या विविध विभागाची आणि त्यांच्या कार्य पध्दतीची माहिती समितीच्या सदस्यांनी जाणुन घेतली. महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती देत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मेट्रो भवन बघितल्यावर समितीने सीताबर्डी ते खापरी असा मेट्रो प्रवास देखील केला.
समितीच्या सदस्यांनी मेट्रोच्या कार्याचा गौरव केला आणि या सेवेमुळे नागपूरचे महत्व अधिकच वाढवल्याचे सांगितले. समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी नागपूरच्या बदलत्या स्वरूपात मेट्रोचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. यावेळी माहिती संचालक तथा समितीचे सदस्य सचिव डॉ.राहुल तिडके, नागपूर विभागाचे माहिती संचालक हेमराज बागुल, मराठवाडा विभागाचे माहिती संचालक किशोर गांगुर्डे तसेच राज्य अधिस्वीकृती समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. प्रारंभी महा मेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजीक प्लॅंनिंग) अनिल कोकाटे, महा व्यवस्थापक (ऑपरेशन) सुधाकर उराडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
एनसीआयला भेट
महामेट्रोच्या सर्व टीमने आज जामठा नजीकच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेला भेट देत पाहणी करीत माहिती जाणून घेतली. यावेळी सर्व पदाधिकारी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यावेळी उपस्थित होते.