विश्वनाथ रहाटे स्मृती प्रित्यर्थ पाणपोईचा शुभारंभ

संदीप कांबळे,कामठी
कामठी : – येथील प्रतिष्ठीत नागरिक विश्वनाथ रहाटे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या स्मृती चिरकाल टिकण्या साठी रहाटे कुटुंबीयांच्या वतीने पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला.
स्व. सिताराम रहाटे स्मृती बहुउद्देशिय संस्था व फेमस क्लाथ स्टोर्स कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने तारसा रोड चौक कन्हान येथे स्व.विश्वनाथ रहाटे स्मृती प्रित्यर्थ जनसेवेकरिता पाणपोईचा आज (ता ३) शुभारंभ करण्यात आला.
पाणपोईचे उद्घाटन  सुशीलाबाई रहाटे यांचे हस्ते नगराध्यक्षा करूणा आष्टणकर यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार, ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जाधव, मराठा सेवा संघ नागपुरचे शहराध्यक्ष प्रमोद वैद्य, सचिव पंकज निंबाळकर, डॉ श्रीकृष्ण जामोदकर, माजी जि प उपाध्यक्ष शरद डोणेकर, न प उपाध्यक्ष डँनियल शेंडे, फेमस क्लाथ स्टोर्स संचालक अमजद अन्सारी आदी उपस्थित होते.
सेवाधर्म हा मोठा गुण असून प्रत्येकाने आपआप ल्या स्वकीयांच्या स्मृतिप्रित्यर्थ असे सामाजिक उपक्रम सुरू करावे असे आवाहन माजी खासदार प्रकाश जाधव यांनी केले. उष्णतेची प्रखरता लक्षात घेता तसेच या चौकात बस स्टाप व व्यापाराचे केंद्र असुन परिसरातील आणि बाहेरगावचे प्रवाशी, शालेय विद्या र्थ्याची चांगलीच वर्दळ असल्याने येथे सार्वजनिक थंड पिण्याच्या पाण्याची नितांत आवश्यकता होती. या गरजेला लक्षात घेऊन स्व.विश्वनाथ रहाटे स्मृतीप्रित्यर्थ सर्वसामान्याच्या सेवेकरिता थंड पाण्याच्या पाणपोई चा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खिमेश बढिये यांनी तर आभार मोतीराम रहाटे यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रभाकर महाजन, शांताराम जळते, संजय निंबाळकर, डॉ हुकुमचंद काठोके, ताराचंद निंबाळकर, पुरूषोत्तम बेले, नेवालाल पात्रे, राजेंद्र खंडाईत, गणेश माहोरे, नथुजी चरडे, नागोराव कडु, वसतराव इंगोले, राजेश राठी, सुतेश मारबते, संतोष दहीफळकर, अशोक खंडाईत, वामन देशमुख, भुषण इंगोले, विनायक काठोके, रिकेंश चवरे, नरेश सोनेकर, मायाताई इंगोले, कांताबाई पाजुर्णे, विद्या रहाटे, एस एन मालविये, रमेश गोळघाटे, कमलसिंह यादव, सुनिल सरोदे, सुर्यभान फरकाडे, गणेश खोब्रागडे, ऋृषभ बावनकर, निलेश गाढवे, आकाश पंडीतकर, दिलीप राईकवार, सय्यद जमाल, प्रमोद वानखेडे, संजय ठाकरे, प्रविण गोडे, केतन भिवगडे, प्रशांत मसार, गौरव भोयर, गजानन वडे, योगेश ठाकरे, गोविंद जुनघरे, माधव काठोके, शैलेश शेळकी, प्रेम धरमारे, सतिश कुथे, संदीप कुकडे, श्रावण खंडाते, बाळु नागदेवे, सचिन वानखेडे, शिवशंकर ब्राम्हणकर, अर्जुन रहाटे, उत्कर्ष रहाटे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आंवला में छिपे है कायाकल्प और रोग प्रतिरोधक क्षमता बढाने के अपार गुण

Sun Apr 3 , 2022
मानव शरीर को अमृत प्रदान करता है आंवला फलम् आंवला यानी अमृता फलम जो काया कल्प एवं रोग प्रतिरोधक क्षमता से बढ़ाने के गुणों से भरपूर हैlआंवला खाने से कई प्रकार की शरीरिक समस्याओं और रोगों से बचाव तथा रोग प्रतिरोधक क्षमता भी बढ़ती है.आंवला के अधपके फल विधिवत सेवन से काले घने और लंबे बालों तथा त्वचा की खूबसूरती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com