पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना विनोद तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण…

–  विनोद तावडेंच प्रकरण दाबण्यासाठी भाजपाने सुप्रिया सुळेंच्या क्रिप्टो करन्सीच प्रकरण समोर आणलं का?. म्हणून हे प्रकरण समोर आणलं असं बोललं जातय. त्यावर विनोद तावडे म्हणाले की, “सुधांशु त्रिवेदी हे ठोस माहिती असल्याशिवाय असे आरोप करणार नाहीत. मी पकडलो गेलो नाही. पैसे मिळालेच नाहीत, त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा विषयच येत नाही.”

“माझ्याकडे 5 कोटी होते, असं सुप्रिया सुळे बोलल्या पण त्या खोटं बोलल्या. त्यांनी आधी माझे पाच कोटी रुपये परत द्यावेत” असं विनोद तावडे म्हणाले. शरद पवार यांनी, विनोद तावडे एक चांगले गृहस्थ आहेत, आरोप सिद्ध झाल्याशिवाय बोलणार नाही असं म्हटलय. त्यावर विनोद तावडे म्हणाले की, “शरद पवार हे परिपक्व नेते आहेत. सिनियर आहेत. ते मला जवळून ओळखतात. मी अशा गोष्टीत असू शकत नाही हे त्यांना माहित आहे, मी त्यांचे आभार मानतो” “मी काल नालासोपाऱ्याला जाणार हे कोणाला माहित नव्हतं. कारण मी वाडामधून निघताना आमचे उमेदवार राजन नाईक यांना फोन केला. कसं चाललय असं मी विचारलं. त्यांनी सांगितलं, आम्ही कार्यकर्ते बसलो आहोत, चहाला या. मला वाटलं, 10-12 कार्यकर्ते आहेत, म्हणून मी तिथे गेलो. यात कोणतही कारस्थान नाही, आपसातल भांडण नाही” असं विनोद तावडे म्हणाले.

“विरोधी पक्षाने एका राजकीय घटनेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला, कारण ते हरत आहेत. निवडणूक आयोग, पोलिसांना काही मिळालं नाही” असं विनोद तावडे म्हणाले. संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांकडे इशारा केला, त्यावर विनोद तावडे म्हणाले की, “हे चुकीचं आहे. मी तिथे जाणार हे कोणाला माहित नव्हतं. दोन मिनिटात अचानक तिथे जायचं ठरलं” भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत क्रिप्टो करन्सी वापरल्याचा आरोप केला. या संबंधीच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत.

सुप्रिया सुळेंच्या क्रिप्टो करन्सीच्या प्रकरणावर म्हणाले…

ही AI जनरेटेड ऑडिओ क्लिप असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. विनोद तावडेंच प्रकरण दाबण्यासाठी भाजपाने हे समोर आणलं असं बोललं जातय. त्यावर विनोद तावडे म्हणाले की, “सुधांशु त्रिवेदी हे ठोस माहिती असल्याशिवाय असे आरोप करणार नाहीत. मी पकडलो गेलो नाही. पैसे मिळालेच नाहीत, त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा विषयच येत नाही.”

Credit by tv9 marthi
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिर्डीत मतदानासाठी विद्यार्थ्यांचा वापर?; राज्यात या ठिकाणी पण राडा, मतदान वाढीसाठी कुणाची काय खेळी?

Wed Nov 20 , 2024
– विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी राज्यात मोठी घडामोड झाली. कुठे मतदारांना पैसे वाटपाचा स्कॅम उघड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला तर काही ठिकाणी उमेदवारांवर हल्ल्याच्या घटना घडल्या. आज पुन्हा काही मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस अगोदर राज्यात अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या घटनांचा आरोप झाला. तर काही ठिकाणी उमेदवारांवर हल्ले झाले. कार्यकर्ते भिडले. तर आजही मतदानाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com