लोकसहभागातून ग्रामविकास साधता येतो – माजी सरपंच प्रांजल वाघ

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा हा उदात्त हेतू समोर ठेवून पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्र शासनाने अनेक लोककल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या असून गाव परिसराचा कायापालट , विकास करावयाचा असेल तर लोकसहभाग असणे गरजेचे आहे असे आवाहन कढोली ग्रामपंचायत चे माजी सरपंच प्रांजल वाघ यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.

समग्र गावाचा विकास करण्यासाठी शासनाच्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या सर्व योजनेची माहिती समस्त ग्रा प पदाधिकाऱ्यानी अवगत करणे गरजेचे आहे.कारण या योजना जनकल्याण व गावाच्या विकासासाठी असतात म्हणून म्हणून ग्रामपंचायत च्या सर्व पदाधिकाऱ्यांनो एकमेकांशी समनव्य साधून ग्रामसभेत या सर्व प्रकारच्या योजनेची महिती देऊन संपूर्ण नागरिकांना समजावून सांगितले पाहिजे.

भारतीय संविधानात ग्रामविकासाला अनन्य साधारण महत्व दिले असून ग्रामविकासाच्या हेतूने तरतुदी केल्या आहेत तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेत अभंगवाणीतून ग्रामविकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनीही कशाचीही तमा न बाळगता स्वता हातात खराटा घेऊन लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधित केले आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी संतांचे विचार अंगीकृत करून आचरणात आणले पाहिजे.

ग्रामस्वछता अभियानात सहभागी होण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रथम व्यक्तिक स्वछतेसह घर व परिसराची स्वछता केली पाहिजे.कचऱ्याची सुका व ओला कचरा अशी विभागणी करून कचरा रस्त्या वाटेवर न टाकता कचरा कुंडीत टाकावे, तसेच कचरागाडीत टाकावे , घराशेजारी व दुतर्फा आणि पडीत जागेवर विविध प्रकारच्या रोपट्याचे वृक्षारोपण करावे , गावात सामाजिक सलोखा ,कायदा, शांतता व सुरक्षितता कायम राखणे अशी कामे ग्रामपंचायत व नागरिकांच्या माध्यमातून करणे अपेक्षित आहे.यासाठी ग्रामपंचायत च्या समस्त पदाधिकाऱ्यांनी गावातील संपूर्ण नागरिकांना विश्वासात घेऊन ग्रामविकासासाठी लोकांचा सहभाग करून घेणे गरजेचे आहे तसेच लोकसहभागाशिवाय ग्रामविकास साधता येऊ शकत नसल्याचे मत माजी सरपंच प्रांजल वाघ यांनी व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ग्रामविकासाच्या नावाखाली राजकारणी बनले ठेकेदार

Mon Aug 26 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- ग्रामविकासाच्या नावावर जनतेची लूट चालवली जात असून जनतेनी निवडून दिलेले राजकारणी ठेकेदार म्हणून काम करीत असतील तर निवडणुकीमध्ये झालेल्या खर्चित रकमेची एकप्रकारे जनतेकडून अप्रत्यक्षपणे वसुली म्हणता येईल .एकंदरीत विकास कामाच्या नावाखाली शासनाचा पर्यायाने जनतेचा लाखो रुपयांचा निधो राजकारण्यांच्या घशात जात आहे असे चित्र कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहे तसेच ग्रामपंचायत स्तरावर होत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!